आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 07:05 PM2017-02-09T19:05:45+5:302017-02-09T19:05:45+5:30

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

The UPA government has used its power to raise its own children and institutions - Chief Minister | आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री

Next

आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वत:ची मुलंबाळे व संस्थाच मोठया करण्यात केला - मुख्यमंत्री
राजीव लोहोकरे/किरण जाधव - वेळापूर आॅनलाईन लोकमत
स्वातंत्र्यानंतर ज्यांनी नेतृत्व केले त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यत विकास पोहचू दिला नाही. स्वत:चा विकास साधत त्यांनी स्वत:च्या संस्था व मुलेबाळे मोठी केली. गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत मूलभूत सुविधा न पोहचल्याने तो तसाच राहिला ही राज्याची शोकांतिका आहे. म्हणून राज्य शासन शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी बरोबरच शेतकऱ्यांना मुबलक वीज, पाणी देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यापुढे आव्हाने खूप आहेत. परंतु आपण आव्हाने संपविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वेळापूर येथील पालखी मैदानावर शेतकरी संघटनेचे उत्तमराव जानकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री ते उपस्थित कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, माढ्याचे संजय शिंदे, माळीनगर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे, सभापती रुपाली बेंदगुडे, अ‍ॅड. सुभाष पाटील, विठ्ठल शिंदे, के. के. पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले, शेतकरी हा खरा पोशिंदा असल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रु.ची थेट मदतीबरोबरच १७ हजार कोटी रुपयांची विविध उपक्रमाव्दारे आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित होता. त्यामुळे आपण जलयुक्त शिवार योजना हाती घेतली़ २२ हजार गावापैकी ४ हजार गावे दुष्काळ मुक्त झाली, त्याचे सर्वश्रेय जनतेला आहे.
येत्या काळात राज्यासह सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असून मागेल त्याला शेततळी यायोजने अंर्तगत १ वर्षात ८ हजार शेततळी या जिल्ह्यात निर्माण झाली असल्याचे सांगून सोलरपंप योजनेची गती वाढावी म्हणूनच फिडरच सोलारवर टाकुन शेतकऱ्यांना १२ महिने २४ तास वीज देणारा पायलट प्रकल्प बनविला़ तो केंद्राने देशातील पथदर्शक प्रकल्प म्हणून मंजुरी केल्याचे सांगत गोरगरीब जनतेच्या अन्न, पाणी व घरे तसेच शिक्षणासाठी शासनाचा संघर्ष चालू असून बीपीएलचे निकष बदलून योग्य लाभार्थ्यांनाच लाभ कसा मिळेल, याकडे लक्ष दिले जाईल. जेवढी घरे मागाल तेवढी घरे मिळतील या पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत जेवढी मागणी असेल तेवढी घरे मिळणार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सुरू केलेल्या २५ हजार डिजीटल शाळांपैकी १७ हजार शाळा संपूर्णपणे ई-लर्निंग झाल्या़ त्यामुळे शिक्षणात देशात १८ व्या स्थानी असणारे महाराष्ट्र राज्य तिसऱ्या स्थानावर आले आहे़ भविष्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ राज्यातील आरोग्य व शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ करोडो जनतेने घेतला असल्याचे सांगितले.
---------------------
प्रस्थापितांना संपवा़़़
माळशिरस तालुक्यात अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित बंड करीत आहेत़ प्रस्थापितांना संपविल्या शिवाय ते थंड होणार नाही, अशी खरमरीत टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
----------------------
२१ गावच्या पाण्याच्या प्रश्न सोडवावा
प्रास्ताविकात उत्तमराव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे दोन वेळा प्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाला होता, पण आता प्रतिक्षा संपली आहे. १३ वर्षापूर्वी भाजप आपण सोडला होता़ तालुक्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कुणीही पाठीशी नसताना लढलो. कारखाना उभारणीसाठीही १४ वर्षे गेली. आता भाजपात प्रवेश करताना काही लोक खोड्या करीत आहेत. परंतु आपण लढवय्या असल्याने तालुक्यातील गलिच्छ राजकारण पध्दत मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. तालुक्यातील सहकारातील भ्रष्टाचार मुख्यमंत्र्यांनी मोडून काढावा, असे सांगून तालुक्याचा एमआयडीसी व निरा देवधर प्रकल्पातून २१ गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: The UPA government has used its power to raise its own children and institutions - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.