‘युजीसी’कडून संशोधन नियतकालिकांची सुधारित यादी प्रसिद्ध; : संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:43 PM2020-04-07T20:43:15+5:302020-04-07T20:44:09+5:30

भारतीय भाषांमधील आणि आंतरराष्ट्रीय अशा १९८ संशोधन नियतकालिकांचा त्यात नव्याने समावेश

An updated list of research journals released by 'UGC'; suspectd 71 journals cancelled | ‘युजीसी’कडून संशोधन नियतकालिकांची सुधारित यादी प्रसिद्ध; : संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली 

‘युजीसी’कडून संशोधन नियतकालिकांची सुधारित यादी प्रसिद्ध; : संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली 

googlenewsNext
ठळक मुद्देसेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स

पुणे : विद्यापीठे व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे संशोधनकार्य प्रसिद्ध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ' युजीसी केअर'अंतर्गत संशोधन नियतकालिकांची (रीसर्च जरनल्स) यादी दर तीन महिन्यांनी सुधारित केली जाते. काही नियतकालिके युजीसी केअरच्या निकषानुसार नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. तर भारतीय भाषांमधील आणि आंतरराष्ट्रीय अशा १९८ संशोधन नियतकालिकांचा त्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. 

पूर्वी काही प्राध्यापकांकडून त्यांचे संशोधन प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या नियतकालिकांपैकी काही नियतकालिके अप्रमाणित पद्धतीने चालवली जात होती.तसेच त्यात काही गैरप्रकार होत होता. त्यामुळे संशोधनाचा दजार्ही सुमार हात चालला होता. या पार्श्वभूमीवर ' युजीसी केअर' अंतर्गत अशा नियतकालिकांची प्रथम सूची जून २०१९ मध्ये 'सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स' या केंद्राने केली. तसेच संशयास्पद ७१ नियतकालिके वगळली.

संशोधन नियतकालिकांच्या महत्वाच्या कामासाठी युजीसीने एक विशेष कक्ष प्रस्थापित केला असून त्याचे मुख्य कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केले आहे. या कामासाठी देशातील इतर चार विद्यापीठे व २५ राष्ट्रीय संस्था यांचे सहाय्य घेऊन दजेर्दार नियलकालिकांची यादी तयार केली जाते. ही यादी दर तीन महिन्यांनी सुधारित करून युजीसी केअर समितीची मान्यता घेऊन प्रसिद्ध केली जाते. यादीत सुधारणा करून १ एप्रिल २०२० रोजी सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती ह्यसेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्सह्ण  केंद्राच्या समन्वयक डॉ. शुभदा नगरकर यांनी दिली.
दजेर्दार नियलकालिकांची यादी दोन गटात विभागलेली आहे. 'गट एक' मध्ये चार विद्यापीठे व इतर २५ संस्थांनी निर्देशित केलेली व केअर निकषानुसार मान्य झालेली  नियतकालिके  आहेत, तर 'गट दोन' मध्ये जगमान्य डेटाबेसमधील नियतकालिके यांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहितीसाठी  ugc.journalcell@gmail.com  या ई-मेलवर सपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
 'गट एक' मध्ये सर्व भारतीय भाषांमधील दर्जेदार संशोधनात्मक नियतकालिके आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तिमाहीमध्ये ३८ नियतकालिके नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यापैकी ८ इंग्रजी आहेत, इतर ३० भारतीय भाषांमधील आहेत.
----------
 'गट दोन' मध्ये जगभरातील मान्यताप्राप्त अशा अमेरिकेतील मॉडर्न लँग्वेज असोसिएशन (एम.एल.ए.) या प्रसिद्ध डेटाबेसमधील १६० नियतकालिके नव्याने समाविष्ट करण्यातआली आहेत.तसेच  'गट दोन' मध्ये आधीच समाविष्ट असलेल्या जगभरातील दोन मान्यताप्राप्त डेटाबेसमधील (वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस) नियतकालिकांबद्दल यूजीसीकडे तक्रारी आल्या होत्या. त्यांची सर्वांगीण पडताळणी केल्यानंतर  स्कोपस या डेटाबेस मधील  अप्रमाणित  ७१ नियतकालिके आता या यादीतून वगळण्यात आली आहेत.

Web Title: An updated list of research journals released by 'UGC'; suspectd 71 journals cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.