‘यूपीआय अॅप’द्वारे सव्वा कोटीचा गंडा
By admin | Published: April 14, 2017 02:38 AM2017-04-14T02:38:11+5:302017-04-14T02:38:11+5:30
‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अॅपचा गैरवापर करून बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतील सहा ग्राहकांना ४९ लाख रुपयांचा आॅनलाइन गंडा घालणाऱ्या जितेंद्र
जळगाव : ‘यूपीआय’ (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अॅपचा गैरवापर करून बॅँक आॅफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतील सहा ग्राहकांना ४९ लाख रुपयांचा आॅनलाइन गंडा घालणाऱ्या जितेंद्र मारुती रंधे (रा. चिखली, जि. बुलढाणा) याचे अन्यही कारमाने आता उघडकीस येत आहेत. जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणांत त्याने १ कोटी २८ लाख रुपये लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच राज्यभरात त्याने नऊ ठिकाणी असे गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.
यूपीआय अॅपचा वापर करून जितेंद्र मारुती रंधे, अता मोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुडकुले, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे व राजेश जनार्दन बुडूखले यांच्या वेगवेगळ्या बॅँक खात्यांत ४८ लाख ९४ लाख ५८२ रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅँकेच्या मुख्य व्यवस्थापिका छाया गिरीश भगुरकर (रा. मोहाडी रोड, जळगाव) यांनी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून १३ जणांविरुद्ध फसवणूक व आयटी अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जितेंद्र रंधेविरुद्ध पुणे शहरात एकच संयुक्त गुन्हा दाखल झाला आहे. तो १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहे. आमच्या तपासात
९ ठिकाणी त्याने असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
- सुनील पवार, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम, पुणे