युपीएससी टॉपर अंसार शेखला लपवावा लागला होता धर्म

By Admin | Published: May 12, 2016 02:10 PM2016-05-12T14:10:06+5:302016-05-12T14:10:06+5:30

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच यूपीएससी परीक्षेत अवघ्या २१व्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या अंसार शेखला आपला धर्म लपवावा लागला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे

UPSC Topper Ansar Shaikh had to hide the religion | युपीएससी टॉपर अंसार शेखला लपवावा लागला होता धर्म

युपीएससी टॉपर अंसार शेखला लपवावा लागला होता धर्म

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 12 - विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच यूपीएससी परीक्षेत अवघ्या २१व्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या अंसार शेखला आपला धर्म लपवावा लागला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुस्लिम असल्याने आपल्याला पुण्यात खोली मिळाली नाही, मेसमध्येही प्रवेश दिला गेला नाही, असे अंसारने सांगितले आहे. अंसार जालनाच्या शेडगावचा रहिवासी असून त्याचे वडिल रिक्षा चालवतात. युपीएससी परिक्षेत 361व्या क्रमांकाने त्याने यश मिळवलं आहे. 
 
अंसार शेखला  दहावीमध्ये 91 टक्के मार्क्स मिळाले होते. त्यानंतर त्याने फर्गुसन कोलेजमध्ये प्रवेश घेतला. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात त्याला रूम हवी होती. 'मित्रांसोबत रूम बघण्यासाठी गेलो असता माझ्या हिंदूधर्मीय मित्रांना रुम मिळत होती पण मुस्लिम असल्याने मला रूम दिली जात नव्हती. शेवटी शुभम वटकर असं नाव सांगितल्यावर मला रुम मिळाली. हे माझ्या मित्राचं नाव आहे, मेसमध्येही हेच नाव वापरावे लागले', असल्याचं अंसारने सांगितलं आहे.
 
'आता मला माझं नाव लपवण्याची गरज नाही. मी शेख आहे शुभम नाही, आणि हे मी आता प्रत्येकाला सांगू शकतो', असं सांगताना अंसार शेखला भरभरुन आलं होतं. परिस्थितीवर मात देत अंसार शेखने यश मिळवल आहे. मात्र हे यश मिळवण्याचा मार्ग अजिबात सोपा नव्हता. 'माझ्या वडिलांची तीन लग्न झाली आहेत. माझ्या कुटुंबात शिक्षणाला अजिबात महत्व नव्हतं. माझ्या मोठ्या भावाने मधेच शाळा सोडली होती आणि माझ्या दोन बहिणींचं शिक्षणदेखील जास्त झालेलं नाही. त्यांची लग्न झाली आहेत. जेव्हा मी घऱी फोन करुन सांगितलं की मी युपीएससी परीक्षेत पास झालो आहे तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसल्याचं', अंसार सांगतो.
अंसार शेखला पुण्यामध्ये कराव्या लागलेल्या परिस्थितीची कहाणी समोर आल्यानंतर अनेकांनी निषेध नोंदवत आपली नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरंजन आवटे यांनीदेखील फेसबुकद्वारे आपली नाराजी व्यक्त करत  प्रत्येकाला आपली ओळख सांगण्याकरता भव्य लौकिक यशच संपादन करावे लागेल काय ? असा प्रश्न विचारला आहे.

Web Title: UPSC Topper Ansar Shaikh had to hide the religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.