उरणचे सबस्टेशन आगीत खाक

By admin | Published: October 24, 2014 04:08 AM2014-10-24T04:08:49+5:302014-10-24T04:08:49+5:30

उरणच्या जीटीपीएस प्रकल्पातील ट्रान्सफार्मरला भीषण आग लागून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनच जळून खाक झाले.

Uranium Substation Fire | उरणचे सबस्टेशन आगीत खाक

उरणचे सबस्टेशन आगीत खाक

Next

चिरनेर /उरण : उरणच्या जीटीपीएस प्रकल्पातील ट्रान्सफार्मरला भीषण आग लागून ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनच जळून खाक झाले. त्यामुळे ऐन दिवाळीत उरणकरांची दिवाळीची पहाट अंधारानेच सुरू झाली. तर या घटनेमुळे संपूर्ण तालुक्याचाच वीजपुरवठा खंडित झाला होता. एमव्हीए ५० ट्रान्सफॉर्मर नं. २ या ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली. या आगीचे कारण अद्याप कळू शकले नसले तरी शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जीटीपीएसच्या या ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीने संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाल्याचे दिसून येत होते. या दुर्घटनेमुळे या प्रकल्पातील विजेच्या आधारावर सुरू असणाऱ्या इतर प्रकल्पांचे कामकाजही ठप्प झाले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष देऊन होते. बोकडविऱ्यापासून काळाकुट्ट धूर अगदी ५ कि.मी.च्या परिसरात पसरल्याचे दिसत होते.
जीटीपीएस, ओएनजीसी, जेएनपीटी आणि सिडकोच्या चार बंबांनी दोन-दोन वेळा बाहेरून पाणी आणून तब्बल साडे तीन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत तब्बल ५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
चार हजार लीटर आॅइलचा साठा असलेल्या या विभागात स्वत:ची आग विझविण्याची यंत्रणाच नसल्याचे यानिमित्ताने समोर आले. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे म्हणाले की, आग विझविण्याची यंत्रणा या ठिकाणच्या अनेक प्रकल्पांत नाही ही गंभीर बाब आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Uranium Substation Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.