शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

By Admin | Published: June 25, 2016 06:52 PM2016-06-25T18:52:10+5:302016-06-25T18:52:10+5:30

शहरीकरणाकडे संकट म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले

Urbanization is a crisis and opportunity - Narendra Modi | शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा - नरेंद्र मोदी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे जाते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेतील प्रकल्पांचा शुभारंभ दिमाखदार सोहळयात शनिवारी बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलात झाला. यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव,  केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप, सचिव स्वाधीन क्षत्रिय महापालिका आयुक्त कुणालकुमार यावेळी उपस्थित होते. 
 
मोदी म्हणाले, शहरीकरणाला संकट समजलो तर त्याच्याशी समरस होणे कठीण होईल. आम्ही शहरीकरणाला संधीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय. गरिबीला पचवण्याची सर्वाधिक ताकद शहरात आहे. त्यामुळेच जिथे जास्त गरिबी असते तेथून लोक शहराकडे कामाच्या शोधात येतात. शहरांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यातून निर्माण होणारी उर्जा विकासासाठी लावता येईल. प्रत्येक शहरांना इमारती, रस्त्त्याच्या लांबीने मोजता येऊ शकत नाही. शहराचे आपले सौंदर्य, आत्मा, आणि ओळख असते. स्मार्ट सिटीचा विचार करताना ते अबाधित ठेवण्यासाठी जनतेकडून विचार मागवले जातात. आत्मा तोच राहील मात्र कायाकल्प बदलून जाईल. बदलत्या जीवनशैलीत व्यवस्थेला गती प्राप्त व्हायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टफोन द्वारे होतोय मात्र हे तंत्रज्ञान सामुहिक सेवांचे माध्यम व्हावे. 
 
स्मार्ट सिटीच्या स्पर्धेमुळे वातावरण बदलले, असे सांगून मोदी म्हणाले, महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांनाही वाटतेय आपले शहर क्रमांक एकचे शहर बनावे. देशात आम्ही गरीब आहोत याची स्पर्धा होती. हे शासन पुढे जाण्याची स्पर्धा करीत आहे. पुढे जाण्याचे रस्ते शोधत आहे. शहरांमध्ये स्पर्धा लागली आहे. पुणे असे व्हावे हे दिल्लीपेक्षा पुणेकरच अधिक चांगल्या पद्धतीने विचार करु शकतात. कल्पनांचे आदानप्रदान हा मुख्य विषय होईल. सरकारी खजान्यातून मिळणा-या गोष्टींसाठी असणा-या योजना चांगल्या असे मानले जायचे, त्यामध्ये पहिल्यांदा बदल झाला आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान काही देत नाही, मात्र स्वच्छतेचा आग्रह धरत आहे. सर्वात अग्रभागी स्वच्छ भारत योजना आहे, हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. संधी द्या आम्ही काही करुन दाखवू शकतो या स्वभावाचे आपल्या देशाचे नागरिक आहेत. 

कंपोस्ट खताला अनुदान देणार 
शहरात निर्माण होणाºया कचºयापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाºया शेतकºयांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल व खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल, अशी विन विन परिस्थिती असेल, असे मोदी यांनी सांगितले़ 
 

Web Title: Urbanization is a crisis and opportunity - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.