राम गोपाल वर्माविरोधात तातडीने कारवाई करा - युवाशक्ती प्रतिष्ठान
By admin | Published: May 29, 2017 02:17 PM2017-05-29T14:17:03+5:302017-05-29T14:17:03+5:30
राम गोपाल वर्माविरोधात कारवाई करण्याची मागणी युवाशक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शितल करदेकर यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - दिग्दर्शक निर्माता राम गोपाल वर्मा यांनी ""Guns & Things"" नावाची यू-ट्युब मालिका सुर केली आहे. या मालिकेमुळे भावी पिढीवर वाईट परिणाम होतील असा दावा करत युवाशक्ति प्रतिष्ठानच्या अध्यक्ष शितल करदेकर यांनी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे राम गोपाल वर्माविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, "राम गोपाल वर्माच्या वायरस ट्रेलरमुळे नक्कीच अनेक प्रश्न उभे राहिलेत व संतापही झाला आहे. दहा वर्षाच्या मुलाने ही मालिका पाहिली तर समाजात बाल बलात्कारी वाढतील यात शंका नाही. गुन्हा करणाऱ्यापेक्षाही तो करण्यासाठी भडकवणारा जास्त गुन्हेगार असतो."
राम गोपाल वर्मा ने नेहमी आपल्या अभद्रतेचे प्रदर्शन ट्विटरवरूनही केले आहे. प्रसिद्धीचा हा स्टंट तो नेहमीच वापरतो. आता तर त्याने ""Guns & Things"" मालिका यू-ट्यूब सुरू केली आहे. कमी वयाच्या मुलांना बिघडवण्याचे हे उद्योग आहेत, असा आरोपही शितल यांनी केला आहे.
समाजातील लेकीबाळींवर भविष्यात होणारे अत्याचार रोखायचे असतील तर पोलिसांनी गुन्हा झाल्यावर काम करण्यापेक्षा रामूसारख्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.