ऊसदराचा अंतिम निर्णय मंत्री परिषदेत
By admin | Published: November 14, 2016 05:20 AM2016-11-14T05:20:36+5:302016-11-14T05:20:36+5:30
ऊसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या उस हंगामात अधिकचा दर मिळणार आहे. पण, कारखानदारांनी ऊसदराबाबत स्पर्धा करु नये,
पुणे : ऊसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना यंदाच्या उस हंगामात अधिकचा दर मिळणार आहे. पण, कारखानदारांनी ऊसदराबाबत स्पर्धा करु नये, पुण्यातील बैठकीत उसदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही. अंतिम निर्णय पुढील आठवड्यात मंत्री परिषदेच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
यंदाच्या हंगामातील ऊस दराबाबत पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर देशमुख यांनी चर्चा केली. देशातील एकूण उत्पादनाच्या २० टक्के साखर सार्वजनिक वापरासाठी लागते. तर उर्वरीत साखरेचा औद्योगिक उत्पादनांसाठी वापर होतो. दैनंदिन वापरासाठी आणि औद्योगिक वापराच्या साखरेबाबत धोरण ठरविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.
दोन कारखान्यांमधील अंतराची अट काढून कारखाने अंतरमुक्त करावेत,त्यामुळे कारखान्यांमध्ये स्पर्धा वाढून चांगले दर मिळतील अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली. कारखान्यांनी एफआरपीची ९७ टक्के रक्कम दिली आहे. तीन टक्के रक्कम बाकी असून, सर्वाधिक कारखाने सोलापूरात आहेत, यांना सॉफ्ट लोन देऊन शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा प्रयत्न करू असे देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)