चंद्रपूर केंद्रावर १३ नाट्यप्रयोग

By admin | Published: November 13, 2015 12:30 AM2015-11-13T00:30:09+5:302015-11-13T00:30:09+5:30

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे

Use of 13 plays in the Chandrapur Center | चंद्रपूर केंद्रावर १३ नाट्यप्रयोग

चंद्रपूर केंद्रावर १३ नाट्यप्रयोग

Next

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा चंद्रपुरातील केंद्रावर १३ नाट्यप्रयोग होणार आहे. १८ नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून ३० नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत.
स्थानिक प्रिदयर्शिनी इंदिरा गांधी नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळात हे प्रयोग होणार आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून चंद्रपूरसह यवतमाळ, गडचिरोली, वर्धा, वणी, येथील नाट्यसंस्था यात सहभागी होत आहेत.
स्पर्धेच्या वेळापत्रकाप्रमाणे १८ नोव्हेंबर सिद्धीविनायक प्रतिष्ठान, यवतमाळ या संस्थेचे नाटक ‘अभिनेत्री’ (लेखक गिरीश जोगी, दिग्दर्शक कल्पना जोशी), १९ नोव्हेंबर समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली या संस्थेचे ‘परिवर्तन’ (लेखक, दिग्दर्शक राजरतन देविदास पेटकर), २० नोव्हेंबर समुत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ ‘तप्त दाही दिशा’ (लेखक डॉ. राजेंद्र धामणे, दिग्दर्शक राजाभाऊ भगत), २१ नोव्हेंबर डॉ. श्यामाप्रसाद सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरचे ‘हणम्याची मरीमाय’ (लेखक विजय खानविलकर, दिग्दर्शक श्रीनिवास मुळावार), २२ नोव्हेंबर कामगार मनोरंजन केंद्र चंद्रपूर या संस्थेचे नाटक ‘देवाशपथ खोट सांगेन’ (लेखक डॉ. मोहन पानसे, दिग्दर्शक मोहन जोशी), २३ नोव्हेंबर कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था यवतमाळकडून ‘खेळ’ (लेखक अनिल दांडेकर, दिग्दर्शक अविश वत्सल), २४ नोव्हेंबर कलाश्रय ज्ञान व कला संवर्धन मंडळ, यवतमाळकडून ‘आसरुबा’ (लेखक सुनील देशपांडे, दिग्दर्शक प्रशांत गोडे), २५ नोव्हेंबर अस्मिता रंगायतन यवतमाळचे ‘माझा खेळ मांडू दे’ (लेखक सई परांजपे, दिग्दर्शक अशोक आष्टीकर), २६ नोव्हेंबर फुलोरा सामाजिक विकास संस्था, वर्धा या संस्थेचे ‘घर तिघाचं हवं’ (लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक विकास फटिंगे), २७ नोव्हेंबर नवोदिया चंद्रपूर या संस्थेचे ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे- गावंडे), २८ नोव्हेंबर कल्पतरु बहुउद्देशीय संस्था, यवतमाळचे ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ (लेखक- अशोक पाटोळे, दिग्दर्शक विलास राखे), २९ नोव्हेंंबर अध्ययन भारती वर्धाकडून ‘श्रीकांत प्रभुणेची प्रेमकथा’(लेखक- श्याम पेटकर, दिग्दर्शक चैतन्य आठले), ३० नोव्हेंबर आदिवासी लोकरंग कलामंच बहुउद्देशीय संस्था, वणी जिल्हा यवतमाळकडून ‘कातरवेळ’ (लेखक डॉ.माणिक वड्याळकर, दिग्दर्शक आनंद गेडाम) असे नाट्यप्रयोग होणार आहेत.
(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Use of 13 plays in the Chandrapur Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.