जटिल शस्त्रक्रियांपूर्वी डॉक्टरांकडून ३ डी तंत्रज्ञानाचा वापर

By admin | Published: February 22, 2016 01:29 PM2016-02-22T13:29:28+5:302016-02-22T13:35:17+5:30

तंत्रज्ञानाने वैद्यकीय शास्त्राला अधिक अचूक बनवले आहे. मुंबईतील डॉक्टरांनी सध्या जटिल शस्त्रक्रियांपूर्वी ३ D प्रिंटेट मॉडेल्सचा उपयोग सुरु केला आहे.

Use of 3D technology from doctors before complex surgery | जटिल शस्त्रक्रियांपूर्वी डॉक्टरांकडून ३ डी तंत्रज्ञानाचा वापर

जटिल शस्त्रक्रियांपूर्वी डॉक्टरांकडून ३ डी तंत्रज्ञानाचा वापर

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - वैद्यकीय शास्त्रामध्ये तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणावर वापर सुरु असून, तंत्रज्ञानाने वैद्यकीय शास्त्राला अधिक अचूक बनवले आहे. मुंबईतील डॉक्टरांनी सध्या जटिल शस्त्रक्रियांपूर्वी ३ D प्रिंटेट मॉडेल्सचा उपयोग सुरु केला आहे. 
३ डी तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना शरीराच्या ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे त्या भागाचा ३ डी प्रिंटेट मॉडेल (नमुना) शस्त्रक्रियेपूर्वी अभ्यासासाठी उपलब्ध होतो. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सर एचएन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका रुग्णावर कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किडनीचे ३ डी प्रिंटेट मॉडेल काढले. या रुग्णाच्या किडनीवर कर्करोगाची गाठ होती. 
सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात येणारे दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक आणि डॉक्टर इंद्रबीर एस गिल यांनी ३ डी प्रिंटेट मॉडेल्सचे तंत्रज्ञान समजावून सांगितले. रुग्णाच्या स्कॅन रिपोर्टसची जी माहिती असते ती कॉमप्युटरमध्ये जमा करायची. ३ डी प्रिंटर संगणकामधील त्या माहितीच्या आधारे मानवी अवयवाचा ३ डी मॉडेल तयार करुन देते. 
आपल्या टीमसह ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी गिल यांनी ३ डी प्रिंटेट मॉडेल अवयवाच्या नमुन्याचा अभ्यास केला. डॉ. गिल यांनी ३ डी प्रिंटेट मॉडेल्सच्या मदतीने आतापर्यंत तीस शस्त्रक्रिया केल्या आहेत. या तंत्रज्ञानाकडून डॉक्टरांना प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मोठी मदत मिळत आहे. 
 

Web Title: Use of 3D technology from doctors before complex surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.