रुग्णांवर उपचारासाठी वापरा प्राचीन म्युझिकल थेरपी

By admin | Published: July 1, 2017 02:34 PM2017-07-01T14:34:16+5:302017-07-01T14:34:16+5:30

गाणी ऐकायला प्रत्येकाला आवडतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रवासामध्ये जो वेळ मिळतो त्यावेळी अनेकजण तुम्हाला मोबाईलवर गाणी ऐकताना दिसतील.

Use the ancient musical therapy for the treatment of patients | रुग्णांवर उपचारासाठी वापरा प्राचीन म्युझिकल थेरपी

रुग्णांवर उपचारासाठी वापरा प्राचीन म्युझिकल थेरपी

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 1 - गाणी ऐकायला प्रत्येकाला आवडतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रवासामध्ये जो वेळ मिळतो त्यावेळी अनेकजण तुम्हाला मोबाईलवर गाणी ऐकताना दिसतील. कारण गाणी मनाला एक वेगळी शांतता, समाधान देऊन जातात. त्यामुळे अनेकांचा शक्य होईल तितकी आवडती गाणी ऐकण्याचा प्रयत्न असतो. गाण्यांमुळे मनामध्ये ऊर्जा, चैतन्य, प्रेरणा निर्माण होते. 
 
आता याच गाण्यांच्या माध्यमातून म्युझिकल थेरपीव्दारे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. म्युझिकल थेरपी एक प्राचीन उपचारपद्धती असून सध्याच्या इंटरनेटच्या युगात अनेकांना याचा विसर पडला आहे. म्युझिकल थेरपीमुळे रुग्णांमध्ये चैतन्य, ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होऊन कठिण उपचारही त्याच्यासाठी सोपे होऊन जातात. 
 
रुग्णामध्ये सकरात्मकता निर्माण करुन त्याची सहनशीलता वाढवणे हा म्युझिकल थेरपीचा उद्देश आहे. मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 30 जुलैला संध्याकाळी 6 वाजता अँटॉप हील येथील अॅस्टर बिल्डींगमध्ये तळमजल्याच्या बँकवेट हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विनामुल्य प्रवेश आहे. 

Web Title: Use the ancient musical therapy for the treatment of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.