हृदय नेण्यासाठी होणार ड्रोनचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2015 04:19 AM2015-09-19T04:19:56+5:302015-09-19T04:19:56+5:30

महिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला

Use of drones to take heart | हृदय नेण्यासाठी होणार ड्रोनचा वापर

हृदय नेण्यासाठी होणार ड्रोनचा वापर

Next

- समीर कर्णुक,  चेन्नई
महिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला लागली होती. शिवाय ही पद्धत मोठी खर्चीक असल्याने यापुढे अशा प्रकारे अवयव वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार फोर्टीस रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. चेन्नाईत नुकताच हा प्रयोग फोर्टिस रुग्णालयाने यशस्वीरीत्या पार पाडला. यात १० किलोमीटरचे अंतर सुमारे आठ मिनिटांत कापण्यात आले होते.
अवयवदानाबद्दल सध्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती पाहायला मिळत आहे. त्यामुळे हृदय प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियादेखील वाढल्या आहेत. हृदय प्रत्यारोपण करताना वेळेची मर्यादा ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. यासाठी मनुष्यबळ आणि खूप खर्च येतो. सध्या देशात आठ ते दहा दिवसांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी पोलीस, विमानतळ प्रशासन आणि रुग्णालयातील कर्मचारी वर्ग यांना पूर्वसूचना देऊन ग्रीन कॉरिडोर निर्माण करावे लागते. मात्र दिवसातून अनेकदा ग्रीन कॉरिडोर करणे शक्य होणार नाही. शिवाय त्यामुळे वाहतूक आणि इतर व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणामदेखील होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन चेन्नईतील फोर्टीस रुग्णालयाने अवयवांची ने-आण करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच एक प्रयोगही केला. तो पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती फोर्टीस रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी दिली.

Web Title: Use of drones to take heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.