फॅन, कूलर जपून वापरा... वीजबिल वाढणार, ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना धाम फोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 07:46 AM2024-04-01T07:46:58+5:302024-04-01T07:48:01+5:30
Electricity bill: राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.
पुणे - राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना १ एप्रिलपासून वीजदरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.
राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असतानाच, ‘महावितरण’ने गेल्या वर्षी सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली.
अशी वाढ हाेईल तुमच्या बिलात
वीजवापर (युनिट्स) जुने दर नवे दर
० ते १०० ५.५८ रुपये ५.८८ रुपये
१०१ ते ३०० १०.८१ रुपये ११.४६ रुपये
३०१ ते ५०० १४.७८ रुपये १५.७२ रुपये
५०१ ते १००० १६.७४ रुपये १७.८१ रुपये