‘आठवड्यातून एकदा खादी वापरा’

By Admin | Published: March 25, 2017 02:47 AM2017-03-25T02:47:32+5:302017-03-25T02:47:32+5:30

एसटी महामंडळाने राज्यातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करा, असे आवाहन केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

'Use Khudia once a week' | ‘आठवड्यातून एकदा खादी वापरा’

‘आठवड्यातून एकदा खादी वापरा’

googlenewsNext

मुंबई : एसटी महामंडळाने राज्यातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करा, असे आवाहन केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
जून २0१६ मध्ये केंद्र शासनाच्या वतीने खादी व ग्रामोद्योगासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक संस्था यामध्ये ऐच्छिक स्वरूपात आठवड्यातून एक दिवस खादीचे कपडे परिधान करा, असे आवाहन केले होते.
त्यासाठी इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरच खाकी गणवेश असलेल्या एसटी चालक-वाहकांनादेखील खादीचा किमान एक संच शिवून घ्यावा व आठवड्यातून एकदा ऐच्छिकतेने परिधान करावा, असे सूचविले आहे. याबाबतचे परिपत्रकच एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Use Khudia once a week'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.