नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा वापर

By admin | Published: June 9, 2016 01:31 AM2016-06-09T01:31:05+5:302016-06-09T01:31:05+5:30

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी पुढाकार घेतला

Use of social media for the safety of citizens | नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा वापर

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा वापर

Next


बारामती : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. प्रतिसाद, पोलीसमित्र अ‍ॅपबाबत शहर परिसर महाविद्यालयासह बारामती पोलिसांनी बैठका सुरू केल्या आहेत. याशिवाय वाहनचोरीची तक्रार आता आॅनलाइन नोंदविता येणार आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यामध्ये जायची गरज नाही. महाराष्ट्र पोलीस विभागाने ‘वाहनचोरी तक्रार’ नावाचे एक नवीन पोर्टल नुकतेच सुरू केले आहे.
वाहनचोरीची तक्रार घरबसल्या, सायबर कॅफेमधून किंवा आपल्या मोबाईलवरून, कोठूनही ‘विनाशुल्क’ नोंदविणे शक्य झाले आहे. तसेच तपासाबाबत स्थिती जाणून घेऊ शकता. यासाठी नागरिकांना ‘आॅनलाइन’ सुरू केलेल्या ‘पोर्टल’वर जाऊन प्रथम नोंदणी करावी लागेल. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांनी सांगितले, की बहुतांश नागरिकांकडे ‘स्मार्ट’फोन उपलब्ध आहेत. ‘इंटरनेट कनेक्ट’ झाल्यानंतर नागरिकांची सुरक्षा अधिक सुकर होणार आहे.
>६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मे
या वेबसाईटवर जाऊन तेथे स्वत:चा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार कार्ड नंबर, स्वत:चे नाव, स्वत: चा पासवर्ड ठरवून भरावा लागेल. यामध्ये वाहनाचा प्रकार, वाहन बनवलेली कंपनी, वाहनाचा आरटीओ नोंदणी क्रमांक, चेसीस नंबर, इंजिन नंबर, मॅन्युफॅ क्चर वर्ष, व्हेईकल मॉडेल, वाहनाचा रंग, वाहन ज्याच्या नावावर आहे त्याचे नाव, वाहन जेथून चोरीला गेले आहे ते ठिकाण, गाव, तालुका, जिल्हा चोरी गेल्याचा कालावधी नमूद करावा लागेल. आपली तक्रार पोर्टलला एकदा नोंद झाल्यानंतर, ती तक्रार वाहन ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधून चोरीला गेले आहे त्या पोलीस ठाण्याकडे वर्ग होईल. तर खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई होणार आहे.

Web Title: Use of social media for the safety of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.