‘मुंडेंकडून व्यवहारात दोन डीन क्रमांकांचा वापर’
By admin | Published: April 22, 2016 03:38 AM2016-04-22T03:38:33+5:302016-04-22T03:38:33+5:30
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कंपनी व्यवहारात दोन डीन (डायरेक्टर इन्फर्मेशन नंबर) क्रमांकांचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे
मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कंपनी व्यवहारात दोन डीन (डायरेक्टर इन्फर्मेशन नंबर) क्रमांकांचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एखाद्या खाजगी कंपनीत संचालक होत असताना डीन नंबर आवश्यक असतो. अशा कंपनी व्यवहारात त्यांनी दोन डीन नंबरचा वापर केला आहे. पहिल्या डीन नंबरचा क्रमांक ०२२४१३९३ असून, तो पंकजा चारूदत्त पालवे या नावाने आहे, त्यामध्ये वडिलांचे नाव मुंडे पांडुरंग गोपीनाथ असा उल्लेख आहे. दुसरा डीन नंबर ००४८९३३० असून, तो पंकजा चारूदत्त पालवे याच नावाने असून, त्यात वडिलांचे नाव मुंडे गोपीनाथ असे आहे. या दोन डीन नंबरचा वापर करून त्यांनी अनेक कंपन्याचे संचालकपद भूषविले आहे. रॅडिको कंपनीतही दोन डीन नंबरच्या आधारे त्या संचालक राहिल्या. या डबलरोलचा घोळ पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केला पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली.(प्रतिनिधी)