कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 05:14 PM2018-01-07T17:14:36+5:302018-01-07T17:14:57+5:30

माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला.

Using the words of debt waiver, the government chose the majority of the criminals - Nana Patole | कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले

कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले

googlenewsNext

चंद्रपूर: माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. येथील कुणबी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पाटील गुरूपुडे, समाजाचे जिल्हा अध्यक्ष विजय देवतळे, सभापती रवी देशमुख , पं स. सदस्य संतोष रडके, रागिनी गुरूपुडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, पहिली कर्जमुक्ती संत तुकारामांनी केली. अशी कर्जमुक्ती अपेक्षित होती. सध्याच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे, स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. पण कोणतेच आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही.

उलट बहुजन समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. पण राजीनामा देणारा मी काही पहिलाच नाही. यापूर्वीही जेव्हा बहुजनांवर अन्याय झाला तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन स्वप्नील नवघडे यांनी केले, तर आभार चक्रधर रोहनकर यांनी मानले.

Web Title: Using the words of debt waiver, the government chose the majority of the criminals - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.