व-हाडाच्या बसला अपघात, धुळ्यातील ३२ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 05:21 AM2017-12-11T05:21:55+5:302017-12-11T05:22:09+5:30
वज्रेश्वरी-अंबाडी रस्त्यावर सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी धुळे येथून वसई येथे लग्नासाठी जाणारी एक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. यात ३२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वज्रेश्वरी : वज्रेश्वरी-अंबाडी रस्त्यावर सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी धुळे येथून वसई येथे लग्नासाठी जाणारी एक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. यात ३२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
धुळे येथील वाघ कुटुंबीयांच्या मुलीचे लग्न वसई येथे साळवे यांच्या कुटुंबामध्ये रविवारी सायंकाळी असल्याने, मुलीचे काका आणि इतर वºहाडी मंडळी श्रीगणेश ट्रॅव्हलच्या बसने सुमारे ६० जणांना घेऊन लग्नासाठी जात होते. बसचा चालक सुरुवातीपासून बस वेगाने चालवत होता. चालकाला प्रवासी वारंवार बस हळू चालविण्यासाठी सांगत होते, परंतु त्याने ऐकले नाही आणि ही बस वज्रेश्वरीजवळ सैतानी पूल येथे आली असताना, भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटून सुमारे ७० फूट उंच असलेल्या पुलावरून खाली कोसळली. यात ३२ प्रवासी जखमी झाले. वज्रेश्वरी येथे राहणारे १०८ रुग्णवाहिकेचे सुपरवायझर मिलिंद कांबळे यांनी १० रुग्णवाहिका उपलब्ध करून स्थानिकांच्या मदतीने जखमींना अंबाडी येथील साईदत्त, जीवदानी व नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातातील जखमींची नावे...
लहू वाघ (३९), मनोज वाघ (३९), भगवान वाघ (५६), बटू वाघ (५७), दगडू खैरनार (५८), नंदलाल वाघ (६३), सनी वाघ (१८), सुमन वाघ (६५), सुनंदा वाघ (२८), सरला वाघ (३६), कासुबाई आहिरे (५२), रत्नाबाई कढरे (४२), बानुबाई वाघ (५३), श्यामराव झालते (५७), अशोक झालते (५३), शांतिलाल झालते (५०), शैलेंद्र वाघ (२७), सुमनबाई वाघ (६२), राजेंद्र वाघ (५१). किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.