राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 09:23 AM2021-12-19T09:23:36+5:302021-12-19T09:24:30+5:30
आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ लाख ३६५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण १२ कोटी ७१ लाख ४१ हजार ४७५ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत ७ कोटी ८६ लाख ३५ हजार ६ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ४ कोटी ८५ लाख ६ हजार ४६९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात १२ लाख ९४ हजार ५१३ आराेग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख ६५ हजार ३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ४८ हजार ३४१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १९ लाख ४५ हजार ८०८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या ३ कोटी ५४ लाख ४ हजार ८०८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ कोटी ९३ लाख ३९२ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ४ कोटी ४६ लाख ४७ हजार ३४८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर २ कोटी ४४ लाख ६५ हजार २६६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.