राज्यात ८ लाख ३० हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:50 AM2021-02-19T03:50:18+5:302021-02-19T03:50:45+5:30
Coarana Vaccination : ४७,०३४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. ९७२ लाभार्थ्यांना काेव्हॅक्सिन लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण ८,३०,३४५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.
मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८४१ लसीकरण सत्रात ४८,००६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४०,९३१ लाभार्थ्यांना पहिला व ७,०७५ लाभार्थ्यांना दुसरा डाेस देण्यात आला.
४७,०३४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. ९७२ लाभार्थ्यांना काेव्हॅक्सिन लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण ८,३०,३४५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.
राज्यात आतापर्यंत २३ हजार ७३२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेण्यात सर्वांत अग्रक्रमी ठाणे जिल्हा असून या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या २ हजार ५७० आहे,. त्याखालोखाल पुण्यात २ हजार ४६ आणि नागपूरमध्ये १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात मुंबईत आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४३८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
सर्वांत कमी लसीकरण
हिंगोली - ५ हजार ९४२, वाशिम - ६ हजार ६३६, सिंधुदुर्ग - ७ हजार ६९६, परभणी - ७ हजार १४६