वऱ्हाडात यावर्षी खताचा साठा मुबलक

By admin | Published: April 25, 2017 12:54 AM2017-04-25T00:54:41+5:302017-04-25T00:54:41+5:30

अकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठ्याचे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे.

In Vadodara, fertilizer stocks are abundant this year | वऱ्हाडात यावर्षी खताचा साठा मुबलक

वऱ्हाडात यावर्षी खताचा साठा मुबलक

Next

५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन

अकोला : यावर्षी बियाण्यांच्या मुबलकतेसह विविध रासायनिक खतांच्या मुबलक साठ्याचे पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) पाच जिल्ह्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सव्वा लाख मेट्रिक टन जास्त म्हणजेच ५ लाख ७९ हजार मेट्रिक टन खताचा हा साठा आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ११ हजार मेट्रिक टन खते प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी पावसाचा अनुकूल अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याच पृष्ठभूमीवर कृषी विभागाने येत्या खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान समजावून सांगण्यासाठी यांत्रिकीकरण, बीबीएफ प्लॅटर आदीद्वारे पेरणी कशी करावी व विविध शेती तंत्रज्ञान वापरू न उत्पादन वाढविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी भेडसावणारा बियाणे आणि रासायनिक खताचा प्रश्न यावर्षी आतापासूनच निकाली काढण्यात आला आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती याच पाच जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सरासरी ४ लाख ८३ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मागच्यावर्षी २०१६ च्या खरीप हंगामात ४ लाख ५२ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध करण्यात आले होते. यावर्षी ५ लाख ७९ हजार मेट्रिक टनाचे आवंटन करण्यात आले असून, आजमितीस १ लाख ११ हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खतांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. या खताच्या साठ्यांमध्ये युरिया, सिंगल सुपर फास्फेटसह डीएपी खताचा साठा आहे.
पश्चिम विदर्भात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र जवळपास १५ ते १७ लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता असली, तरी चांगल्या पावसाचा अंदाज बघता कापसाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे.

रासायनिक खताचा साठा यावर्षी मुबलक असून, बियाण्यांचीही मुबलकता आहे. त्यामुळे यावर्षी खते व बियाण्यांची अडचण भासणार नाही. पावसाचा अंदाजही अनुकूल असल्याचे शेतकऱ्यांना अडचण भासू नये, यासाठीची तयारी कृषी विभागाने केली आहे.
-एस.आर. सरदार, विभागीय संयुक्त संचालक,अमरावती.

Web Title: In Vadodara, fertilizer stocks are abundant this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.