वडवली हत्याकांड : हसनैनची शेअरबाजारात साडेचार कोटींची उलाढाल
By admin | Published: March 10, 2016 03:48 AM2016-03-10T03:48:38+5:302016-03-10T03:48:38+5:30
संपूर्ण कुटुंब संपवणारा क्रुरकर्मा हसनैन वरेकर याने गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारात तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली होती.
जितेंद्र कालेकर, ठाणे
संपूर्ण कुटुंब संपवणारा क्रुरकर्मा हसनैन वरेकर याने गेल्या पाच वर्षांत शेअर बाजारात तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली होती. मात्र जानेवारी २०१६ मध्ये त्याच्या सिंडीकेट बँकेतील खात्यात एक पैसाही बॅलन्स नव्हता. या आर्थिक फटक्यातून सावरण्याकरिता त्याने वेगवेगळ््या लोकांकडून लक्षावधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड तो करु शकत नव्हता. त्यातच मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या बत्तुलच्या औषधाच्या गोळ््या हसनैन वैद्यकीय सल्ला न घेता खात होता, अशी माहिती आता तपासात उघड झाली आहे.
आर्थिक संकटात सापडलेला हसनैन गेले काही महिने आपल्या बहिणींसोबत विकृत चाळे करीत होता. मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेली औषधे परस्पर खात होता. वडील व आईकडे कर्जाच्या खाईतून बाहेर पडण्याकरिता पैशाची मागणी करीत होता. हे सर्व लक्षात घेतल्यास हसनैन हाही या परिस्थितीतून मनोरुग्ण बनला होता किंवा कसे, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.
शेअर बाजारात पैसे गुंतविण्यासाठी हसनैनने घोडबंदर रोडवरील सिंडीकेट बँकेत डीमॅट अकाऊंट सुरु केला होता. याच खात्यात त्याने गेल्या चार ते पाच वर्षांत तब्बल साडेचार कोटींची उलाढाल केली, असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. काहीवेळा तो तोटयात असला तरी त्याची गुंतवणूक अव्याहत सुरुच होती. याच काळात त्याने आई आणि मावशीला त्यांच्या माहेरुन मिळालेले ३० लाख रुपये घेतले तर मेव्हणे शौकत खान यांच्याकडून सात लाख, आई असगडी आणि पत्नी जबीन यांचे दागिने विजय पार्क येथील एका सोनाराकडे गहाण ठेवून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले. सुबियाच्या लग्नाच्या वेळीही त्याने पाच लाखांचे कर्ज त्याने घेतले होते. असे ७० ते ८० लाखांचे कर्ज त्याच्यावर असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
बहिणीच्या गोळ््या खायचा
हसनैनची लहान बहिण बत्तुल ही तीन दिवसांची असल्यापासून तिची मानसिक प्रकृती चांगली नव्हती. त्यावेळी ठाण्याच्या डॉ. साने यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, फरक न पडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुणे येथील डॉ. देव यांच्याकडे उपचार सुरू होते. कर्जबाजारी झाल्यानंतर कुवैतला जाण्याकरिता हसनैन वडिलांकडे ४५ लाखांची मागणी करीत होता. मात्र ती त्यांनी पूर्ण झाली नाही. त्या बेचैनीमुळे त्याला झोप येत नव्हती. बहिणीला दिलेल्या गोळ््या तो खायचा. आईने त्याला रोखले होते. मीच गोळया आणल्या आहेत, मला काय करायचे ते माहित आहे, असे तो सांगायचा, अशी माहिती सुबियाने पोलिसांना दिली