पंतप्रधानांकडून वैशालीची विचारपूस

By admin | Published: June 26, 2016 03:11 AM2016-06-26T03:11:00+5:302016-06-26T03:11:00+5:30

‘‘काय गं वैशाली, बरी आहेस ना!’’ म्हणत चॉकलेट देत पंतप्रधानांनीच विचारपूस केली आणि चिमुकली वैशाली भारावून गेली. हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट मोदींना पत्र पाठणाऱ्या या चिमुकलीची मोदी

Vaishali's opinion from PM | पंतप्रधानांकडून वैशालीची विचारपूस

पंतप्रधानांकडून वैशालीची विचारपूस

Next

पुणे : ‘‘काय गं वैशाली, बरी आहेस ना!’’ म्हणत चॉकलेट देत पंतप्रधानांनीच विचारपूस केली आणि चिमुकली वैशाली भारावून गेली.
हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी थेट मोदींना पत्र पाठणाऱ्या या चिमुकलीची मोदी यांनी पुणे दौऱ्यात आवर्जून भेट घेऊन तिला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. वैशालीनेही नरेंद्र काकांचे मन:पूर्वक आभार मानले. हडपसर येथील वैशाली यादवच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. या शस्त्रक्रियेसाठी ३ लाख रुपयांचा खर्च येणार होता. मात्र घरच्या बिकट परिस्थितीमुळे हा खर्च ती करू शकत नव्हती. तिने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून मदत मागितली होती. मोदींनी या पत्राची जातीने दखल घेतली आणि १५ दिवसांपूर्वीच तिच्यावर पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. ‘‘तुला मोठेपणी काय व्हायचे आहे?’’ अशी विचारणा मोदी यांनी केली असता पोलीस व्हायचे असल्याचे उत्तर वैशालीने दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Vaishali's opinion from PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.