वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

By admin | Published: June 27, 2017 01:55 AM2017-06-27T01:55:30+5:302017-06-27T01:55:30+5:30

पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण

Vaishnavachal Mela rested Phaltan | वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

वैष्णवांचा मेळा फलटणला विसावला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण (जि. सातारा) : पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाची आस धरत निघालेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी ऐतिहासिक फलटण शहरात स्वागत करण्यात आले. ‘माउली... माउली’च्या गजराने अवघी फलटण नगरी दुमदुमली.
फलटणच्या विमानतळावर विसावा घेऊन पालखी मंगळवारी बरडकडे मार्गस्थ होणार आहे. पालखी जिंती नाक्याहून मलटन, पाचबत्ती चौक मार्गे मुधोजी
मनमोहन राजवाड्यासमोर आल्यानंतर पालखीचे स्वागत नाईक-निंबाळकर घराण्याच्यावतीने सातारा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असा संदेश अभंगातून देत वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश तुकोबारायांनी दिला. हाच वसा घेऊन पुणे येथील वृक्षवल्ली ग्रुप पर्यावरणाचा संदेश देत ज्ञानोबा माऊलींच्या वारीत मार्गक्रमण करीत आहे. सुमारे १५० युवक-युवती वारीत सहभागी झाले आहेत. वारीतील त्यांचे हे सातवे वर्ष आहे. ५५० ठिकाणी दिंडी मार्गावर त्यांनी झाडे लावली.

Web Title: Vaishnavachal Mela rested Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.