साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी वझे
By admin | Published: October 6, 2016 05:04 AM2016-10-06T05:04:31+5:302016-10-06T05:04:31+5:30
डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आयोजक आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
डोंबिवली : डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आयोजक आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
बिगर राजकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने संमेलनावर कोणताही राजकीय शिक्का बसलेला नाही. अर्थात त्यासाठी वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्न करणारे राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि त्यांच्यासाठी शब्द टाकणारे काही साहित्यिक यांच्या दबावाला बळी न पडता आयोजक संस्थेने ही निवड केली आहे. स्वागताध्यक्ष निवडीचे अधिकार निमंत्रक संस्थेला असल्याने त्यांनी ही निवड बुधवारी अधिकृतपणे घोषित केले. आगरी यूथ फोरमने आगरी महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. गेली १३ वर्षे ते आगरी महोत्सवाचे आयोजन करतात. या महोत्सवातून त्यांनी अनेक ज्ञाती-समाज जोडले आहेत. त्यातच साहित्य संमेलनाच्या आयोजनाची कल्पना समोर आली. ती विचारात घेऊन फोरमने साहित्य संमेलन डोंबिवलीत व्हावे यासाठी यापूर्वी दोन वेळा मागणी केली होती. यंदा पुन्हा पाहणी झाल्यावर डोंबिवलीचे नाव नक्की झाले. संमेलनावर राजकीय किंवा विशिष्ट विचारसरणीचा शिक्का बसू नये म्हणून आयोजकांनी वझेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
संमेलन कसे असावे, त्यात कोणत्या विषयांचा समावेश असावा याबाबत पहिली बैठक रविवारी, ९ आॅक्टोबरला सर्वेश सभागृहात होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. (प्रतिनिधी)