व्हॅलेंटाइन ट्रेंड्स!
By admin | Published: February 13, 2016 10:33 PM2016-02-13T22:33:10+5:302016-02-13T22:33:10+5:30
व्हॅलेंटाइन डेला हटके दिसायला तरुणाईला आवडते. कपड्यांपासून ते चपलांपर्यंत सगळे कसे अप-टू-डेट हवे असते. त्यामुळे मुंबईतील अनेक शॉपिंग डेस्टिनेशन्स तरुणाईने
व्हॅलेंटाइन डेला हटके दिसायला तरुणाईला आवडते. कपड्यांपासून ते चपलांपर्यंत सगळे कसे अप-टू-डेट हवे असते. त्यामुळे मुंबईतील अनेक शॉपिंग डेस्टिनेशन्स तरुणाईने बहरून गेली आहेत. दरवर्षी वेगवेगळे ट्रेंड येतात आणि त्यांना तरुणाई फॉलो करते. याच ट्रेंडवर एक नजर....
मॉलही ‘व्हॅलेंटाइनमय’
शहर आणि उपनगरातील मॉल्स व्हॅलेंटाइनच्या रंगात रंगले आहेत. मॉल डेकोरेशनबरोबरच अधिकाधिक जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या शॉपिंग स्कीम आणि मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले आहे. यात अनेक कपल्सना आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत.
‘कॅज्युअल लूक’ला पसंती
यंदा कुल अटायरला तरुणाईची पसंती आहे. मुलींमध्ये कॅज्युअल लूकचे वनपीस, मॅक्सी ड्रेस, कॉटन स्कर्ट, क्रॉप टॉप्स, स्लिट टॉप्स, जेगिंग्ज, हाय वेस्टेड पॅन्टस असे काही प्रकार आवर्जून खरेदी केले जात आहेत; शिवाय त्यावर शोभतील अशा हेवी दिसणाऱ्या चोकरसेट, लॉग चेन विथ पेंडटला पसंती दिली जात आहे. तर पुरुषांमध्ये लाईट कलर टी-शर्ट आणि जॅकेटची मागणी आहे.
पॅम्परिंग
एक दिवस पॅम्पर करून घ्यायला अनेकांना आवडते. ही आवड लक्षात घेऊन अनेक पार्लरमध्ये कपल्ससाठी काही खास ब्युटी आॅफर्स ठेवल्या आहेत. मेनिक्युअर, पेडिक्युअर ते अगदी त्या दिवशी तुम्हाला खास लूक देण्यासाठी अनेक पार्लर्सनी चांगल्या आॅफर्सही व्हॅलेंटाइन वीकसाठी ठेवल्या आहेत. या आॅफर्स ५०० रुपयांपासून आहेत.
‘मिनीआॅन्स’ कार्टून्सची चलती
मिनीआॅन्स या कार्टून चित्रपटाची क्रेझ अजूनही आहे. बाजारात अनेक ठिकाणी मिनीआॅन्सचे पेडेंट, किचेन, सॉफ्ट टॉईज उपलब्ध आहेत. कार्टून आवडणाऱ्यांना गिफ्टसाठी हा चांगला पर्याय आहे. यांच्या किमती साधारण २०० रुपयांपासून पुढे आहेत.
कुटुंबासाठीही खास आॅफर्स
हल्ली व्हॅलेंटाइन जोडप्यांपुरता मर्यादित राहिला नाही तर तो आता सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन साजरा करायचा दिवस झाला आहे. त्यामुळे या दिवशी हॉटेलिंग आणि वन-डे टूरसाठीही अनेक ट्रॅव्हल्सतर्फे प्लॅनिंग टूर अरेंज करण्यात येत आहेत.
बॅग्ज : आॅफिसमध्ये जाणाऱ्या तरुण-तरुणींना वेगवेगळ्या बॅग्ज वापरायला अधिक आवडतात. मुलांसाठी लेदरच्या लॅपटॉप बॅग आणि मुलींसाठी साईड बॅग आणि बॅगपॅक अशा ड्युअल युजच्या बॅगनाही तितकीच मागणी आहे. लेदर मटेरिअलच्या या बॅगा ८०० रुपयांपासून पुढे आहेत.
फोटो प्रिंटेंड केक्स
कुछ मिठा हो जाए! म्हणत केक कापून व्हॅलेंटाइन डे अनेक जण साजरा करतात. हल्ली केकवर ‘स्वत:चे फोटो प्रिंट’ करून घ्यायला अनेकांना आवडते. यंदाही अनेक केक शॉपमध्ये कपल्स मेमरीज् केक बनवून घेतले जात आहेत. केक ५०० रुपयांपासून पुढे आहेत.
व्हॅलेंटाइन डेला चांगले दिसायला मुले आणि मुली दोघांना आवडते. फेब्रुवारीपासूनच अनेक जण स्वत:ला पॅम्पर करण्यासाठी पार्लरला येत आहेत; शिवाय अनेक कपल्स तर गिफ्ट म्हणून ‘ब्युटी पॅकेज’ची खरेदी करत आहेत. - तुषार चव्हाण, हेअर स्टायलिस्ट