VALENTINE WEEK : हॅप्पी रोझ डे
By admin | Published: February 7, 2017 11:42 AM2017-02-07T11:42:37+5:302017-02-07T11:46:52+5:30
नवीन नात्याची सुरुवात करत आहात वा जुन्याच नात्यातील गोडवा आणखी वाढवायचा असेल, यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दुवा असतो ती म्हणजे 'भेटवस्तू'.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - नवीन नात्याची सुरुवात करत आहात वा जुन्याच नात्यातील गोडवा आणखी वाढवायचा असेल, यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा दुवा असतो ती म्हणजे 'भेटवस्तू'. निरनिराळ्या प्रकाराचे गिफ्ट देण्याच्या यादीत गुलाबाचे फुल हे एक महत्त्वाचे मानले जाते, यामुळे नात्यामध्ये सुगंध दरवळतो, मग ते नाते कोणतेही असो. गुलाब हे प्रेम, आवड आणि सौंदर्याचे प्रतिक आहे, असे म्हटले जाते.
म्हणूनच तर व्हेलेंटाईन सप्ताहची सुरुवातदेखील 'रोझ डे' पासून होते. मात्र व्हेलेंटाईन वीक केवळ प्रेयसी-प्रियकरांपर्यंत मर्यादित नाही. प्रत्येक नात्यांमधील रंग आणखी गडद करण्यासाठी 'व्हेलेंटाईन वीक डे' साजरे केले जातात. प्रियकर-प्रेयसी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना लाल रंगाचे गुलाब देतात तर मैत्री किंवा अन्य नात्यांमध्ये रंग भरण्यासाठी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे गुलाब दिले जाते.
कोणत्या रंगाचे गुलाब कोणाला द्यावे?
पिवळे गुलाब - मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी पिवळे गुलाब देऊन रोझ डे साजरा केला जातो
नारिंगी गुलाब - ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिला/त्याला नारिंगी रंगाचे गुलाब द्यावे
पांढरे गुलाब - ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे, तिला/त्याला सॉरी बोलण्यासाठी पांढरे गुलाब द्यावे
लाल गुलाब - प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचे गुलाब आवडत्या व्यक्तीला दिले जाते. पण केवळ गुलाबच देऊन चालणार नाही, सोबत एखादे भावना व्यक्त करणारे पत्र, कार्ड किंवा संदेश लिहून दिला तर 'रोझ डे' साजरा करताना आणखी चार चाँद लागतील.
व्हेलेंटाईन वीक
7 फेब्रुवारी - रोज डे
8 फेब्रुवारी - प्रपोज डे
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे
10 फेब्रुवारी - टेडी डे
11 फेब्रुवारी - प्रोमिस डे
12 फेब्रुवारी - किस डे
13 फेब्रुवारी - हग डे
14 फेब्रुवारी - व्हेलेंटाईन डे