लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 11:04 PM2017-09-09T23:04:21+5:302017-09-09T23:06:41+5:30

लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव शनिवारी दहाच्या सुमारास संपला .एकूण 82 लहान -मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला.

The value of 31 lakh 25 thousand rupees for the gold veneer offered by the Lalbaug's king | लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

Next
ठळक मुद्देएकूण 82 लहान -मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला.

मुंबई, दि. 9 -  लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव शनिवारी दहाच्या सुमारास संपला .एकूण 82 लहान -मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला. लिलाव करण्यात आलेल्या अलंकारांचे एकूण मूल्य 98 लाख 48 हजार एवढे आहे. सोन्याच्या वीटेला सर्वाधिक म्हणजेच 31 लाख 25 हजारांची किंमत मिळाली तर सोन्याच्या गणेशमूर्तीला 14 लाख 50 हजार एवढी किमत मिळाल्याची माहिती सुधीर साळवी यांनी दिली. 

दरवर्षी करोडे रूपये राजाच्या दानपेटीत जमा होतात. यंदा मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला. जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांकडे या नोटा तशाच राहिल्या. चलनातून रद्द झालेल्या नोटा दिलेल्या मुदतीत व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. चलनातून बाद झालेल्या नोटा लोकांनी थेट लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केल्याचं उघड झालं आहे

दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा कमी दान
यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.

5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदी
लालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.

Web Title: The value of 31 lakh 25 thousand rupees for the gold veneer offered by the Lalbaug's king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.