Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:03 PM2024-06-04T17:03:16+5:302024-06-04T17:05:11+5:30

Prakash Ambedkar On Lok Sabha Result 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले.

Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar has reacted on Lok Sabha Election Result 2024  | Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : "आमचा पराभव झाल्याने निराश आहे पण...", प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

Lok sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले नाही. खुद्द प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. ते अकोला या जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात होते. वंचितला आलेले अपयश याची दखल देत प्रकाश आंबेडकरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'च्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. अकोल्यात तिरंगी लढत होईल असे अपेक्षित असताना भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी चांगली आघाडी घेत विजय मिळवला. इथून काँग्रेसच्या तिकिटावर अभय पाटील मैदानात होते. 

जनतेचा जनादेश स्वीकारतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा आणि उर्वरित महाराष्ट्राचा जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. मी प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो. मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीचा पराभव केला. 

तसेच आमचा पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे, पण मी आशा सोडलेली नाही. माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू आणि त्यांचे विश्लेषण करू. याशिवाय आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू. वंचित बहुजन आघाडी विजय असो, असेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. 

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर पाहायला मिळाला होता. पण, यावेळी वंचितला म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही. राज्यात सांगली वगळता महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत झाली. सांगलीत विशाल पाटील यांनी अपक्ष विजय मिळवला. 

Web Title: Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar has reacted on Lok Sabha Election Result 2024 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.