विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:54 PM2019-09-04T15:54:59+5:302019-09-04T15:56:19+5:30

लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

Vanchit Bahujan Aghadi Front spoils ahead of Assembly elections? | विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज 

विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी? जागावाटपावरून MIM नाराज 

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारत मते मिळवित चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीचं आगामी विधानसभा निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या पुढे मतदान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत. 

एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत यश मिळवित राज्यात पहिले खाते उघडले. मात्र प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

त्यामुळे भारिपला मुस्लिम मतांचा फायदा होत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांचे मत बनले आहे. मुस्लिम मतदार एमआयएम नव्हे मौलानांच्या प्रभावाखाली असल्याची आंबेडकरांना वाटतं. तर एमआयएमला राज्यातील विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे त्यामुळे एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे तर वंचितने एमआयएमला फक्त 8 जागांची ऑफर दिली आहे. 

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरु आहे. चर्चेतून जास्तीत जास्त 75 जागांपर्यंत एमआयएम आघाडी मान्य करेल मात्र प्रकाश आंबेडकरांनी खासदार असदुद्दीनऔवेसी यांच्याशी चर्चा करण्याचं ठरवलं आहे. राज्यात एमआयएमची ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर आमचे उमेदवार दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे खासदार औवेसी यांच्याकडून अद्याप निरोप आला नाही तो निरोप आल्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू असं जलील यांनी सांगितले. 

तर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला 144 जागांची ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीला सोडून वंचित बहुजन आघाडी काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार आहे मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी लागेल असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसताना पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: Vanchit Bahujan Aghadi Front spoils ahead of Assembly elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.