"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 06:21 PM2020-09-14T18:21:50+5:302020-09-14T18:30:11+5:30

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.  

Vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar on maratha reservation | "जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

googlenewsNext
ठळक मुद्देजोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही - प्रकाश आंबेडकरआपल्या जातीबरोबर राहायचे, की आरक्षणाबरोबर राहायचे हे गरीब मराठा समाजाने ठरवणे आवश्यक - आंबेडकरआठवडाभरात घेतला जाऊ शकतो मंदिरं खुली करण्याचा निर्णय - प्रकाश आंबेडकर


मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आघाडी सरकारविरोधात सकल मराठा समाजाने संताप व्यक्त करत, वेळप्रसंगी कोरोनाचे संकट झुगारून रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना "जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.  

प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. त्यामुळे श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोपर्यंत गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणही मिळणार नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांनी आपली भूमिका घेणे आवश्यक आहे. आपल्या जातीबरोबर राहायचे की आरक्षणाबरोबर राहायचे हे त्यांनी ठरवणे आवश्यक आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आठवडाभरात घेतला जाऊ शकतो मंदिरं खुली करण्याचा निर्णय -  
राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरे खुली झाली तर मोठा महसूलही राज्य सरकारला मिळेल. सरकारसोबत चर्चा सुरू आहे. मंदिरे खुली करण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. आठवडाभरात मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही आंबेडकरांनी सांगितले.

...तर गरीब मराठ्यांनी आरक्षणावर पाणी सोडावे - 
यापूर्वी रविवारी, प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, “महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदारांपैकी 182 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध आहेत. नात्यागोत्याचे राजकारण करतात आणि इतरांना राजकारणात येऊ देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. गरीब मराठ्यांनी आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केलेला. तो आता न्यायालयात आहे. श्रीमंत मराठ्यांची सत्ता असतानासुद्धा गरीब मराठ्यांच्या बाजूने ते लढत नाहीत, ही परिस्थिती आहे. माझे गरीब मराठ्यांना आवाहन आहे, की त्यानी त्याचा लढा दिल्या शिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही. पाहूया गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधत लढायला उतरतो का? तो उतरला तर त्याला आरक्षण मिळेल. तो उतरला नाही, तर त्याने आरक्षणावर पाणी सोडावे."

महत्त्वाच्या बातम्या -

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

Web Title: Vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.