विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:32 PM2020-08-22T18:32:35+5:302020-08-22T22:13:15+5:30

राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे.

Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar will agitate with 1 lakh Warkaris to open Vitthal's temple | विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन

विठ्ठलाचे मंदीर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 1 लाख वारकऱ्यांसह करणार आंदोलन

Next

कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही.

राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत. 

कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजपासोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर 31 ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. सध्या पंढरपूर मध्ये 2035 कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. या विषयावर वाद पेटला असताना सर्वसामान्य वारकरी मात्र या वादापासून अलिप्तच आहेत.

आंदोलनाआधी जिल्ह्याधिकाऱ्यांसोबत बैठक-

दरम्यान 24 ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूरमध्ये 2035 कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अन्य महत्वाच्या बातमी-

धक्कादायक! भारतातील सांडपाण्यातही सापडले कोरोनाचे नमुने; सेंटर फॉर मॉलिक्यूलर बायोलॉजीचा दावा

" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच"

Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Web Title: Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar will agitate with 1 lakh Warkaris to open Vitthal's temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.