अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:26 PM2021-03-22T14:26:07+5:302021-03-22T14:27:49+5:30

Param Bir Singh Letter: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे.

vanchit bahujan aghadi prakash ambedkar demands president rule in maharashtra after governor meet | अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे - प्रकाश आंबेडकर अन्यथा हे सर्वपक्षीय आहे असे आम्ही समजू - प्रकाश आंबेडकर राज्यातील हत्यांची चौकशी नाही - प्रकाश आंबेडकर

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. (vanchit bahujan aghadi prakash ambedkar demands president rule in maharashtra after governor meet)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्री अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे, असे आम्ही समजू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

हे सर्वपक्षीय आहे असे आम्ही समजू

राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू करणे गरजेचे आहे. सभागृह बरखास्त करता कामा नये. नवे सरकार आले तर गुन्हेगारी घटक बाहेर ठेवता येईल आणि नव्या व्यवस्थेने राज्य करता येईल अशी परिस्थिती आहे, जर रिपोर्ट गेला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं समजू, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सचिन वाझे यांचा जबाब लोकांसमोर आणला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज्यातील हत्यांची चौकशी नाही

राज्यात राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

Web Title: vanchit bahujan aghadi prakash ambedkar demands president rule in maharashtra after governor meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.