वाळू तस्करांविरुध्द वडनगरीकरांचा उद्रेक

By admin | Published: November 17, 2016 12:10 AM2016-11-17T00:10:08+5:302016-11-17T00:10:08+5:30

विना परवानगी होणारी वाळूची अवैध वाहतूक व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनला पोहचलेला धोका पाहता तालुक्यातील वडनगरी ग्रामस्थांनी बुधवारी रात्री आठ वाजता एल्गार पुकारत नदी

Vandagirika eruption against sand smugglers | वाळू तस्करांविरुध्द वडनगरीकरांचा उद्रेक

वाळू तस्करांविरुध्द वडनगरीकरांचा उद्रेक

Next

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ : विना परवानगी होणारी वाळूची अवैध वाहतूक व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनला पोहचलेला धोका पाहता तालुक्यातील वडनगरी ग्रामस्थांनी बुधवारी रात्री आठ वाजता एल्गार पुकारत नदी पात्रातच वाळूचे तब्बल १६ डंपर अडविले. काही चालक व डंपरवरील मजूर ग्रामस्थांच्या अंगावर धावून आल्याने संतापात अख्खे गाव नदीपात्रात धावून आले. ग्रामस्थांच्या या उद्रेकामुळे डंपर चालकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही डंपरच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान,डंपरची जाळपोळ झाल्याची अफवा पसरल्याने तहसीलदार व पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

वडनगरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूचा अमर्याद उपसा होतो. दरराजे ४० ते ४५ डंपर येथून वाळूची वाहतूक करतात. विशेष म्हणजे या नदीपात्राचा एकदाही लिलाव झालेला नाही, त्यामुळे चोरट्या पध्दतीने व दादागिरीने येथून वाळूची उचल होते. जेसीबी व मजूरांच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात शंभर ते दीडशे फूट खोल खड्डे पडले आहेत.हळूहळू हा उपसा गाव व शेतकऱ्यांच्या पाईप लाईनपर्यंत पोहचत असल्याने सरपंच पती महेंद्र चौधरी, उपसरपंच जगदीश सोनवणे, पोलीस पाटील जितेंद्र पाटील,अनिल सोनवणे, सुदर्शन सोनवणे, शशिकांत सोनवणे, प्रवीण सोनवणे, हर्ष, सोनवणे, भगवान सोनवणे यांच्यासह संतप्त ग्रामस्थांनी नदीपात्र गाठून डंपर अडविले.

पोलीस बंदोबस्त
तहसीलदार निकम यांनी जागेवरच चालक बोलावून सर्व १६ डंपर रात्रीच जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. त्यात ६ डंपर भरलेले तर १० रिकामे होते. मालक व चालक रात्री उशिरापर्यंत निष्पन्न झालेले नव्हते. वाळू तस्करांविरुध्द खुद्द तहसीलदार निकम यांनीच पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.


पकडण्यात आलेल्या डंपर असे
एम.एच.१९ झेड ७७७४, एम.एच.१९ झेड ३९१७, एम.एच.१९ झेड ५५००, एम.एच.१९ झेड ४७९६, एम.एच.१९ झेड २०००, एम. एच.१९ बी.एम. ४४४३, एम.एच.१९ झेड ६१६१,एम.एच.१९ झेड ७७७४, एम.एच.१९ झेड ६६६९,एम.एच.१९ झेड ९९९२, एम.एच. १९ झेड ७७४७, एम.एच.१९ झेड २९६२,एम.एच.१९ -१३१६, एम.एच.१९ झेड ३९१९,एम.एच.४८-०२९१,आर.जे.१२ जे.ए.१८६३


तहसीलदार व पोलिसांमुळे टळला अनर्थ
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी तातडीने घटनास्थळ गाठले,त्यापाठोपाठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक निरीक्षक सागर शिंपी, जितेंद्र पाटील, प्रफुल्ल धांडे, शैलश चव्हाण, गिरीश पाटील, विजय दुसाने, राजेंद्र बोरसे, अरुण सोनार, तलाठी नन्नवरे दाखल झाले. तहसीलदार निकम यांनी ग्रामस्थांची समजूत घालून वाळू तस्करांची गय केली जाणार नाही,त्यांच्यावर कारवाई होणारच असे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांचा संताप निवळला. तरीही संभाव्य खबरदारीचा उपाय म्हणून नियंत्रण कक्षातून अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला होता.

Web Title: Vandagirika eruption against sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.