मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग मोकळा! काम अंतिम टप्प्यात; अन्य ५ ट्रेनवर शिक्कामोर्तब?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:27 PM2023-12-14T17:27:42+5:302023-12-14T17:27:56+5:30

Vande Bharat Express Train: रेल्वे मंडळाकडून मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला एक वंदे भारत ट्रेन देण्यात आली आहे.

vande bharat express from mumbai to jalna likely to get green signal railway board allotted six train to various rail region | मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग मोकळा! काम अंतिम टप्प्यात; अन्य ५ ट्रेनवर शिक्कामोर्तब?

मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग मोकळा! काम अंतिम टप्प्यात; अन्य ५ ट्रेनवर शिक्कामोर्तब?

Vande Bharat Express Train: देशभरातून वंदे भारत ट्रेनची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय रेल्वेही अधिकाधिक वंदे भारत ट्रेन सुरू करण्यावर भर देताना दिसत आहे. महाराष्ट्रात विविध मार्गांवर वंदे भारत सुरू करण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. यातच मुंबई ते जालना मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंडळाने सहा वंदे भारत ट्रेनचे वितरण केले आहे. मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि दक्षिण रेल्वेला एक वंदे भारत देण्यात आली आहे. संत रामदासस्वामींचे जन्मस्थळ, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आनंदी स्वामींचे मंदिर आणि अन्य तीर्थक्षेत्र जालन्यात आहेत. येथे जाणाऱ्या मुंबईकरांना जालन्यासाठी जलद आणि आरामदायी पर्याय वंदे भारतमुळे उपलब्ध होणार आहे. वंदे भारतची ४४ आणि ४६वी आठ डब्यांची गाडी मध्य रेल्वेला देण्यात आली आहे. एक गाडी मुंबई-जालना मार्गावर धावणार आहे. गाडीचे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.

पाच वंदे भारतचे करण्यात आले वितरण

एकूण आठ डब्यांच्या चार आणि १६ डब्यांची एक अशा पाच वंदे भारतचे वितरण करण्यात आले आहे. उंच पेंटोग्राफ असलेली पहिली वंदे भारत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पासाठी वंदे भारत ट्रेनवर शिक्कामोर्तब केल्याने आता काश्मीर खोऱ्यातूनही वंदे भारत धावणार आहे. उत्तर रेल्वेवरील यूएसबीआरएल प्रकल्पासाठी एका वंदे भारत ट्रेन राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर रेल्वेच्या अखत्यारितील यूएसबीआरएल प्रकल्प साधारण जानेवारी २०२४मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे. यासाठी वंदे भारत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला होता. प्रकल्पासाठी आठ डब्यांची वंदे भारत देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यूएसबीआरएल प्रकल्प पूर्ण झाल्यावर सर्वात आधी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याची घोषणा केली आहे.

 

Web Title: vande bharat express from mumbai to jalna likely to get green signal railway board allotted six train to various rail region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.