Vande Mataram GR in Maharashtra: महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 19:17 IST2022-10-01T19:16:41+5:302022-10-01T19:17:14+5:30
राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली.

Vande Mataram GR in Maharashtra: महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला
महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे. वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन उद्या करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या जीआरची माहिती दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त विविध स्पर्धा, शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.
या महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे. आनंदमठमध्ये हे गीत लिहीताना जन गन मन हे राष्ट्र गीत आणि वंदे मातरमला मान्यता देण्यात आली. इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. हे शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
संभाषणाची सुरुवात हॅलोने झाली. ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.