पक्ष्यांपासून संरक्षित ज्वारीचे वाण विकसित

By Admin | Published: October 24, 2015 04:29 AM2015-10-24T04:29:06+5:302015-10-24T04:29:06+5:30

पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे उभारण्यापासून ते गोफण, फटाके वाजविण्याचे विविध प्रयोग शेतकरी करतात़ त्यानंतरही ज्वारी, बाजरीसारखी

The varieties of protected sorghum developed from the birds | पक्ष्यांपासून संरक्षित ज्वारीचे वाण विकसित

पक्ष्यांपासून संरक्षित ज्वारीचे वाण विकसित

googlenewsNext

- भाऊसाहेब येवले,  राहुरी
राहुरी : पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे उभारण्यापासून ते गोफण, फटाके वाजविण्याचे विविध प्रयोग शेतकरी करतात़ त्यानंतरही ज्वारी, बाजरीसारखी पिके पक्ष्यांपासून वाचविण्यास अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. मात्र, आता शेतात दाणे भरत असताना पक्ष्यांना ज्वारी खाता येणार नाही, असे वाण विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
ज्वारी फुले पंचमी असे या सुधारित वाणाचे नाव असून, सध्या हा वाण लाह्या बनविण्यासाठी विकसित केला आहे़ मात्र, पक्ष्यांपासून होणारे नुकसान टाळता येत असल्यामुळे तो शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे़ होप प्रकल्पाअंतर्गत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने लाह्यांसाठी ‘फुले पंचमी’ हा सुधारित ज्वारी वाण विकसित केला आहे़ अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांच्या शेतात त्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला़ या ज्वारीचे दाणे भोंडात असल्याने पक्ष्यांना ते खाता येत नाहीत, असे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ़ शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
डॉ़ गडाख म्हणाले, लाह्यांसाठी पूर्वी देशात विविध प्रकार नव्हते. मालदांडीपासून ५० टक्के लाह्या तयार होत असत़ त्यामुळे लाह्यांची ज्वारी तयार करण्याचा विचार पुढे आला़ ‘फुले पंचमी’ ज्वारीपासून ९७ टक्के लाह्या तयार होतात तर केवळ ३ टक्के हलग्या राहतात़ या ज्वारीला पक्ष्याने चोच मारल्यानंतर त्याच्या नाकाला टोचते़ त्यामुळे पक्षी कणसातील दाणे खात नाहीत़

२० क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन
अन्य ज्वारीला १५ रूपये किलो भाव मिळतो़ मात्र या वाणाला २८ ते ३२ रूपये किलो याप्रमाणे भाव मिळतो़ हेक्टरी २० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळते़ अधिक उत्पादनासाठी योग्य वेळी पेरणी, बांधबंदिस्ती, आंतरमशागत या बाबी महत्त्वाच्या आहेत़ ‘फुले पंचमी’ वाण ११५ ते १२० दिवसांत काढणीस येतो़ हेक्टरी ४० ते ४५ क्ंिवटल कडब्याचे उत्पादन मिळते़ आॅक्टोबरअखेर ज्वारीची पेरणी केली जाते़

तयार करण्याची पद्धती
लाह्या तयार करण्यासाठी प्रथम ज्वारी स्वच्छ धुऊन घ्यावी़ किंवा ज्वारीवर दोन-तीन टक्के पाणी शिंपडून कापडामध्ये बांधून दहा-बारा तास दडपून ठेवावी़ त्यामुळे ज्वारीच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते़ नंतर शेगडीवर कढई ठेवून त्यामध्ये बारीक मीठ टाकून गरम करावे़ मीठ गरम झाले की त्यात ओलविलेली लाह्यांची ज्वारी टाकावी़ ती हलवत राहावी. लाह्या फुटणे बंद झाल्यावर लाह्या व मीठ वेगळे करावे़ लाह्यांच्या रव्यापासून वडी बनविली जाते़

Web Title: The varieties of protected sorghum developed from the birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.