१२ ग्रंथांतून उलगडणार बाबासाहेबांचे विविध पैलू
By Admin | Published: April 19, 2016 04:05 AM2016-04-19T04:05:54+5:302016-04-19T04:05:54+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत १२ ग्रंथांतून बाबासाहेबांचे विविध
अहमदनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज मिशन’ उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत १२ ग्रंथांतून बाबासाहेबांचे विविध पैलू पुन्हा उलगडणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी दिली.
बाबासाहेबांचे विचार व योगदान यावर राज्यातील तज्ज्ञांनी १२ ग्रंथांचे लेखन सुरू केले आहे. संच मे-२०१६ मध्ये प्रकाशित होईल. या विषयांवर वर्षभरात ३५ जिल्ह्यांतील ३५६ तालुक्यांमध्ये व्याख्याने होणार आहेत.
१२ ग्रंथ व लेखक : शिक्षणतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. यू.म. पठाण, औरंगाबाद), राष्ट्रभक्त डॉ. आंबेडकर (डॉ. भूषणकुमार जोरगुलवार, लातूर), राज्यशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. व्ही.एल. एरंडे, निलंगा-लातूर), संरक्षण विषयक तज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. विजय खरे, पुणे), प्रशासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संभाजी खराट, मुंबई), महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बी.व्ही. जोंधळे, औरंगाबाद), नवसंस्कृतीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. यशवंत मनोहर, नागपूर), अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. इंद्रजीत आल्टे, औरंगाबाद), समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्रा. डॉ. प्रदीप आगलावे, नागपूर), कृषितज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (प्राचार्य डॉ. सुभाष खंदारे, वर्धा), जलतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. डी.टी. गायकवाड, पुणे), विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. विजयकुमार पोटे, अहमदनगर) (प्रतिनिधी)