नोटा बदलताना वेगवेगळे ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 05:23 AM2016-11-14T05:23:31+5:302016-11-14T05:23:31+5:30
एका दिवसात केवळ चार हजार रुपयांच्याच जुन्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घालण्यात आल्याने यातून मार्ग काढण्यासाठी
वैभव बाबरेकर / अमरावती
एका दिवसात केवळ चार हजार रुपयांच्याच जुन्या नोटा बदलून देण्याची मर्यादा घालण्यात आल्याने यातून मार्ग काढण्यासाठी अनेक जण शक्कल लढवित आहेत. अनेक जण वेगवेगळ्या बँकांमध्ये नोटा बदलताना आपली वेगवेगळी ओळखपत्रे सादर करीत आहेत.
प्रत्येक बँकेमध्ये पाचशे आणि एक हजार रुपये बदलून देताना एक अर्ज संबंधितांकडून भरून घेतला जात असून त्यासोबत त्या ग्राहकाला आधार, पॅनकार्ड किंवा मतदानकार्डाची सत्यप्रत देणे अनिवार्य आहे. याचाच फायदा घेत एकच व्यक्ती एका ठिकाणी आधारकार्ड, दुसऱ्या ठिकाणी पॅनकार्ड तर, तिसऱ्या ठिकाणी मतदानकार्ड दाखवून नोटा बदलून घेत असल्याची माहिती बँकिंग सूत्रांनी दिली.