येणाऱ्या ४८ तासांत वरुणराजा बरसणार!
By admin | Published: June 26, 2016 09:39 AM2016-06-26T09:39:36+5:302016-06-26T09:40:49+5:30
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खऱ्या अर्थाने कोकणात गेल्या ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम असून, येणाऱ्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील काही भागातही जोरदार वृष्टी झाली. हमखास पावसाचा बेल्ट समजल्या जाणाऱ्या घाटमाथ्यावरचा पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्राच्या उत्तरी भागात, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील काही भागांत होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. २६ जून रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.
मागील २४ तासांत कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत सवार्धिक १९२ मि.मी. पावसाची नोंद रायगड जिल्ह्यात म्हसळा येथे झाली आहे.
२५ जून सकाळी ६ पासून २६ जून रोजी पहाटे ३.२० पर्यंत नांदेड शहरात ३८ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे येथे सर्वाधिक १०७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी कल्याण ३६.५, मुरबाड ३.८, भिवंडी ४३.१, शहापूर २४.३, अंबरनाथ ९.८ तर उल्हासनगर येथे शून्य पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात पालघर येथे सर्वाधिक १४२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी वसई १०९, डहाणू ५१.१, वाडा ४४.३, जव्हार १०, मोखाडा १३, तलासरी २२.५ तर विक्र मगड येथे १७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे १२६ मिमी झाला. उर्वरित ठिकाणी वेंगुर्ला १०७, मालवण ९१, सावंतवाडी ९०, कुडाळ ६३, वैभववाडी २४, कणकवली २२ मि.मी. नोंद झाली.