वसई रोड - उरण रो-रो वाहतूक सुरू करण्यास रेल्वे अनुकूल
By Admin | Published: November 10, 2016 05:25 AM2016-11-10T05:25:02+5:302016-11-10T05:25:02+5:30
ठाणे शहरावर माल वाहतुकीचा सर्वात मोठा ताण आहे. ट्रक्स व ट्रेलर वाहतुकीच्या या ताणातून ठाणे शहराची सुटका व्हावी, यासाठी ठाण्याचे राज्यसभा सदस्य
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
ठाणे शहरावर माल वाहतुकीचा सर्वात मोठा ताण आहे. ट्रक्स व ट्रेलर वाहतुकीच्या या ताणातून ठाणे शहराची सुटका व्हावी, यासाठी ठाण्याचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना भेटून वसई रोड ते उरण या
मार्गावर कोकण रेल्वेच्या धर्तीवर रो-रो वाहतूक सुरू करण्याची आग्रही मागणी केली. विशेष म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी त्यास लगेच अनुकूलता दर्शवली असून त्यावर त्वरेने
कारवाई करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाला दिले.
ठाण्याच्या वाहतूक कोंडीविषयी माहिती देतांना खा. सहस्त्रबुध्दे म्हणाले, पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीला पर्याय नसल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील सारी वाहने नाशिक मार्गे ठाण्यात येतात. याखेरीज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ची माल हाताळणी क्षमता वाढल्यामुळे भिवंडी परिसरात माल गोदामांची संख्या बेसुमार वाढली आहे.
परिणामी ठाणे शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण
पूर्वीपेक्षा तिपटीने वाढले आहे. त्याचबरोबर रस्ते अपघातांची संख्या आणि वाहतुकीतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणातही प्रमाणाबाहेर वाढ झाली आहे.