वसई-विरार महापालिकेला नालेसफाईचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 02:24 AM2017-05-14T02:24:07+5:302017-05-14T02:24:07+5:30

वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे

Vasai-Virar Municipal corporation forgets Nalasfai | वसई-विरार महापालिकेला नालेसफाईचा विसर

वसई-विरार महापालिकेला नालेसफाईचा विसर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पावसाळा वीस दिवसांवर येऊन ठेपला असतानाही वसई-विरार महापालिकेने मुख्य नाल्यांची सफाई काम हाती न घेतल्यामुळे पालिकेला सफाईचा विसर पडल्याची चर्चा केली जात आहे.
वसई-विरार परिसरातील मुख्य नाल्यांची एप्रिल-मे महिन्यातच साफ सफाई करण्यात येते. नाल्यातील गाळ, पान वनस्पती काढून नाल्याची खोली व्यविस्थत केली जाते. त्यामुळे डासांच प्रादुर्भाव रोखला जातो. तसेच पावसाळ्यामध्ये सांडपाण्याचा निचरा सुरळीत होतो. मात्र यंदा मे महिनचा पंधरवडा उलटत आला तरी नालेसफाईला सुरवात करणत आलेली नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढले आहेत. तसेच नाल्यांची सफाई न केल्यामुळे पावसाळ्यामध्ये सांडपाणी आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका आहे.
>अस्वच्छ वसई
दिवाणमान तलावाने तळ गाठला असून विसर्जन केलेल्या मूर्त्या नजरेस पडू लागल्या होत्या. महानगपालिकेकडून त्या भास्कर आळी समुद्र किनाऱ्यावर टाकल्या जात असतांना नागरिकांनी त्यावर आक्षेप घेऊन त्या समुद्रात पुन्हा विसर्जन करायला लावल्या आहेत.

Web Title: Vasai-Virar Municipal corporation forgets Nalasfai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.