वसईत आता स्वयंचलित सिग्नल
By admin | Published: November 19, 2016 03:22 AM2016-11-19T03:22:39+5:302016-11-19T03:22:39+5:30
येत्या २६ नोव्हेंबरला वसईतील नऊ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुुरु होत आहे.
वसई : येत्या २६ नोव्हेंबरला वसईतील नऊ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा सुुरु होत आहे. वसई-विरार पालिकेने विविध १६ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरु केले असून त्यासाठी ३ कोटी ११ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहे.
वसई-विरार पालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखेने पालिकेकडे ५२ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने अंबाडी चौक वसई पश्चिम, रेंजनाका वसई पूर्व, वर्तक कॉलेज वसई पश्चिम, टाकी नाका तुळींज नालासोपारा पूर्व, पार्वती क्रॉस रोड माणिकपूर, चंदननाका नालासोपारा, ६० फुटी रोड वसई पश्चिम, पाटणकर पार्क नालासोपारा, पंचवटीनाका माणिकपूर, जकातनाका विरार, चिमाजी अप्पा स्मारक चौक, जुने विवा कॉलेज विरार, वसंत नगरी आचोळे, वर्तक चौक फुलपाडा विरार, एव्हरशाईन सिटी, साईनाथनाका नालासोपारा या १६ ठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
ही यंत्रणा उभारण्यासाठी ३ कोटी ११ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत. सी. एम. एस. कप्युटर्स लिमिटेड या कंपनीला हा ठेका देण्यात आला असून पाच वर्षांपर्यंतची देखभाल दुरुस्ती कंपनी करणार आहे. (प्रतिनिधी)
>सध्या अंबाडी चौक वसई पश्चिम,रेंजनाका वसई पूर्व, वर्तक कॉलेज वसई पश्चिम,पार्वती क्रॉस रोड माणिकपूर, ६० फुटी रोडवसई पश्चिम,पंचवटीनाका माणिकपूर, चिमाजी अप्पा स्मारक चौक, वसंतनगरी आचोळे, एव्हरशाईन सिटी या ९ ठिकाणची यंत्रणा बसवण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या २६ नोव्हेंबरपासून सिंग्नल यंत्रणा सुुरु होणार आहे.