वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 02:17 PM2024-07-04T14:17:49+5:302024-07-04T14:18:15+5:30

Vasant More Uddhav Thackeray Meet: पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Vasant More's big announcement! will entry Uddhav Thackeray shivsena on 9 july; The reason of left VBA told, Pune Politics news | वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...

वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढविणारे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वगृही येताय, पण उशीर केला असे म्हटल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच आपण ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी जाहीर केले. 

मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे होतोय. उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले. आता पक्ष प्रवेश करणार आहे, बाकी चर्चा पुढे होईल, असे वसंत मोरे म्हणाले. तसेच आज नाही तर येत्या ९ तारखेला मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याचे मोरे यांनी जाहीर केले. 

मी मनसे सोडून वंचितमध्ये गेलो होतो. मात्र मतदारांनी मला स्वीकारले नाही, असेही त्यांनी वंचित सोडण्याचे कारण सांगितले. पुण्यात शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीत कडवे आव्हान देणार असल्याचे मोरे म्हणाले. 

विधान सभा लढविणार का या प्रश्नावर मोरे यांनी आता पक्ष प्रवेश करू, नंतर यावर चर्चा करू असे मोरे म्हणाले. तसेच विधासभा लढविण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो. लोकसभेला पुणे शहरात माझे मतदान नव्हते, माझा तो भागही नव्हता. तरीही मला चांगली मते मिळाली आहेत. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू, असेही मोरे यांनी स्पष्ट केले. 

मनसे का सोडलेली?
वसंत मोरे हे मनसेत असल्यापासून कायम चर्चेत राहिले होते. अनेकदा पक्षात राहून वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलनाला वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांची तातडीने पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होती. त्यातच वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र, मनसेची लोकसभेची भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Vasant More's big announcement! will entry Uddhav Thackeray shivsena on 9 july; The reason of left VBA told, Pune Politics news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.