वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:28 AM2018-12-14T02:28:43+5:302018-12-14T02:28:56+5:30

शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वाटप

Vasantdada Sugar Institute Announces Awards | वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारांची घोषणा

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारांची घोषणा

googlenewsNext

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप कालावधी वाढविण्यासाठी शुगर बीट उपयुक्त असून शेतकऱ्यांना व कारखानदारांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच साखरेच्या उत्पादनात वाढ होणार असून, इथेनॉल निर्मितीचे प्रमाणही वाढणार आहे. याबाबतचे सादरीकरण येत्या १५ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. तसेच साखर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया शेतकरी व कारखानदारांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, असे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे दिल्या जाणाºया विविध पुरस्कारांची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक विकास देशमुख उपस्थित होते. २०१७-१८ या गळीत हंगामात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन काढणाºया शेतकºयांना ऊस भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ऊस भूषण पुरस्कारासाठी दक्षिण विभागात सांगलीतील शोभ चव्हाण या शेतकºयाची आणि राजारामबापू पाटील साखर कारखान्याची तसेच कोल्हापुरातील मोहन चकोते या शेतकºयाची आणि सांगलीतील दत्त शेतकरी साखर कारखान्याची आणि दत्तात्रय चव्हाण व डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.

मध्य विभागासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी पाटील व तानाजी पवार या शेतकºयांची आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना निवडला आहे.तर पुणे जिल्ह्यातील प्रकाश ढोरे या शेतकºयाची आणि संत तुकाराम साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे. तसेच उत्तरपूर्व विभागातून लातूर जिल्ह्यातील वैशाली विलासराव देशमुख आणि विलास सहकारी साखर कारखान्याची आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रविकिरण भोसले या शेतकरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना निवडला आहे.

राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्काराचे मानकरी
राज्यस्तरीय कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कारासाठी कोल्हापुरातील चवगोंडा आण्णा पाटील या शेतकºयाची व दत्त शेतकरी साखर कारखान्याची निवड केली आहे. तर कै. वसंतराव नाईक पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील सौरभ विनयकुमार कोकिळ या शेतकºयाची आणि जयवंत शुगर्सची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे कै. आण्णासाहेब शिंदे पुरस्कारासाठी मारूती शिंदे या शेतकºयाची व तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे.

विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार :
दक्षिण विभाग
प्रथम क्रमांक : उदगिरी शुगर अ‍ॅण्ड पॉवर लि. ता. खानापूर, जि. सातारा,
द्वितीय क्रमांक : कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, ता. करवीर,
तृतीय क्रमांक : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू, लाड साखर कारखाना,ता. पलूस
मध्य विभाग
प्रथम क्रमांक : श्री अंबिका शुखर प्रा. लि. ता. कर्जत
द्वितीय क्रमांक : अगस्ती साखर कारखाना, ता. अकोले
तृतीय क्रमांक : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, ता. माळशिरस
उत्तर पूर्व विभाग
प्रथम क्रमांक : विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, ता. लातूर
द्वितीय क्रमांक : विलास साखर कारखाना, निवळी, लातूर
तृतीय क्रमांक : बारामती अ‍ॅग्रो लि. ता. कन्नड, जि. औरंगाबाद

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार
दक्षिण विभाग : छत्रपती शाहू साखर कारखाना, ता. कागल
मध्य विभाग : नीरा भीमा साखर कारखाना, ता. इंदापूर
उत्तरपूर्व विभाग : रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर

कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार :
रेणा साखर कारखाना, ता. रेणापूर, जि. लातूर.

कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवणी
पुरस्कार :
दौंड शुगर प्रा.लि.

कै. आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार : पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, ता. केडगाव, जि. सांगली.

कर्मयोगी शंकरराव पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार : डॉ.डी.जी.बापू लाड साखर कारखाना

सा.रे.पाटील सर्वोकृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार : विघ्नहर साखर कारखाना, ता. जुन्नर

वैयक्तिक
पुरस्कारांची यादी
उत्कृष्ट मुख्य शेती अधिकारी : संभाजी पांडुरंग थिटे
उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी : आर. के. गोफणे
उत्कृष्ट चीफ इंजिनिअर : गजेंद्र गिरमे
उत्कृष्ट चीफ केमिस्ट :
संजय साळवे
उत्कृष्ट चीफ अकाऊंटंट : अमोल अशोकराव पाटील
उत्कृष्ट आसवाणी व्यवस्थापक :
धैर्यशील रणवरे
उत्कृष्ट कार्यकारी संचालक : राजेंद्रकुमार रणवरे
उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी : राजेंद्र चांदगुडे, संतोष वाघमारे, सिकंदर शेख

विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार : छत्रपती शाहू साखर कारखाना

Web Title: Vasantdada Sugar Institute Announces Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.