Lok Sabha Election 2019 : सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:20 PM2019-03-30T13:20:58+5:302019-03-30T13:24:53+5:30

राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत आज दुपारी होणार आहे.

Vasantdad's grandson will fight for Swabhimani Shetkari Sanghatana | Lok Sabha Election 2019 : सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातू

Lok Sabha Election 2019 : सांगलीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातू

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढणार वसंतदादांचे नातूउमेदवारी निश्चित : राजू शेट्टींकडून थोड्या वेळात घोषणा शक्य

सांगली : राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामार्फत आज दुपारी होणार आहे.

संपूर्ण राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून बराच खल झाला. ही जागा कॉंग्रेसला मिळणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी याबाबतचा निर्णय घेताना कॉंग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी वसंतदादा घराण्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त करीत कॉंग्रेसलाच ही जागा मिळावी म्हणून राजकीय दबावतंत्र वापरले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

दरम्यान कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देत राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने वातावरण अधिक तापले होते. त्यांचे कनिष्ठ बंधू विशाल पाटील यांनीही दादा गटाचा स्वतंत्र मेळावा घेऊन लोकसभा निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रसंगी बंडखोरी करण्याबाबत त्यांच्या समर्थकांनी त्यांना सल्ला दिला होता. त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार का, असा प्रश्नही उपस्थित होत होता. त्यांनी थेट आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

वसंतदादा घराण्यातील व्यक्ती प्रथमच अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. इतिहासात प्रथमच असा प्रकार घडत असल्याने राजकीयदृष्ट्या ही घटना महत्त्वपूर्ण बनली आहे. त्यामुळे ही लढत आता राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे खासदार संजयकाका पाटील, वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश शेंडगे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे.

Web Title: Vasantdad's grandson will fight for Swabhimani Shetkari Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.