वसईत युवाजल्लोषची धूम

By admin | Published: May 19, 2016 04:06 AM2016-05-19T04:06:58+5:302016-05-19T04:06:58+5:30

युवदर्शन आयोजित युवाजल्लोष २०१६ मोठया उत्साहात व दिमाखात रविवार दि. १५ मे २०१६ रोजी सेंट मरी मग्दालेन चर्च, मुळगाव आवारात झाला.

Vasayat Yuva Jaloschi Dhoom | वसईत युवाजल्लोषची धूम

वसईत युवाजल्लोषची धूम

Next


वसई : युवदर्शन आयोजित युवाजल्लोष २०१६ मोठया उत्साहात व दिमाखात रविवार दि. १५ मे २०१६ रोजी सेंट मरी मग्दालेन चर्च, मुळगाव आवारात झाला. पाच दिवस चाललेल्या या सोहळयात फाईन आर्टसच्या सहा स्पर्धा व चार नाटय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. १११५ स्पर्धकांनी आपली कला सादर केली. पोस्टर मेकींग, पेटींग, स्केचिंग, फोटोग्राफी, व्हिडीओ डॉक्युमेंटरी, जिंगल, मोनो अ‍ॅक्टींग, एकांकिका, पथनाटय, समूह गायन, समूहनृत्य यांचा समावेश होता. समारोपाला दोन हजार युवकयुवती उपस्थित होते. सर्व स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी अनेक फादर्स, सिस्टर्स व हजारोंच्या संख्येने युवकयुवती आले होते. आर्चबिशप फेलिक्स माच्याडो हयांनी युवकांना प्रोत्साहनपर संदेश दिला. ते म्हणाले प्रत्येक माणसाला करमणुकीची गरज असते. प्रत्येक कष्ट उपसणाऱ्या व्यक्तीने विश्रांती घेतली पाहिजे. उन्हाळयाची सुट्टी हा एक विशेष काळ आहे. युरोप, अमेरिकेतील लोक या काळाची तयारी करतात. या सुट्टीची चांगली आखणी करतात. या सुट्टीत गेली अनेक वर्षे आपले युवकयुवती हया युवाजल्लोष कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करतात. युवकहो मी सदैव दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही चांगले करीत राहा. खूप मोठे होत रहा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (युवती)‘आटापिटा बबली’ - सेनेरा दिब्रिटो, ‘भाग’- आई सिमरन दौडती, ‘श्री तशी सौ’ - जशलीन गोम्स (प्रतिनिधी)

Web Title: Vasayat Yuva Jaloschi Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.