वासुदेव कामत यांचा अमेरिकेत सन्मान
By Admin | Published: May 8, 2016 03:44 AM2016-05-08T03:44:09+5:302016-05-08T03:44:09+5:30
जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला असून, हा मोठाच गौरव मानला जातो.
मुंबई : जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला असून, हा मोठाच गौरव मानला जातो. जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिकेतर्फे सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार देण्यात येतो.
चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत जगातील ७00 ते ८00 कलाकार सहभागी होत असतात. त्यातील आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेतही हजारो कलाकारांचा सहभाग असतो. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात. कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला २00६ साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.