व्यंगचित्रकार बळी लवंगारे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:47 AM2017-07-31T03:47:51+5:302017-07-31T03:47:51+5:30
प्रख्यात व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे (६७) यांचे कुर्ला-नेहरूनगर येथील राहत्या घरी रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
मुंबई : प्रख्यात व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे (६७) यांचे कुर्ला-नेहरूनगर येथील राहत्या घरी रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. चेंबूरच्या चरई स्मशानभूमीमध्ये त्यांचा पुतण्या श्रेयस याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. लवंगारे यांच्या पश्चात पत्नी लता, कन्या नेहा व श्रद्धा असा परिवार आहे.
काळाचौकी परिसरात वाढलेल्या लवंगारे यांनी मासिक, दैनिकांपासून ते दिवाळी अंकांद्वारे खुसखुशीत आणि ठसकेबाज व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. महापालिकेच्या शिक्षण विभागातही त्यांनी काम केले. सुरुवातीला चित्रकलेची आवड असलेल्या लवंगारे यांनी पुढे कलेला हास्याचा तडका देत, प्रसिद्धीला गवसणी घातली. हास्य व्यंगचित्रकारांनी सुरुवात केलेल्या लवंगारे यांच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाºया व्यंगचित्रांनीही राजकीय पुढाºयांना चांगलेच चिमटे काढले.