‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:02 IST2025-03-27T15:02:33+5:302025-03-27T15:02:51+5:30

Prakash Ambedkar News: इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा-आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

vba leader prakash ambedkar criticized bjp and rss over saugat e modi | ‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले...

‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले...

Prakash Ambedkar News: सीएए आणि एनआरसी दरम्यान तुमच्यासोबत उभे राहिलेल्यांना दुर्लक्षित केले पाहिजे; पैगंबरांच्या अपमानाच्या विरोधात तुमच्यासोबत उभे राहिलेल्यांना दुर्लक्ष करा; मुस्लीम तरुणांची अटक थांबवा, असे म्हणणारे मोबाईल स्टेटस पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे ते म्हणतात. आधी त्रास देणे आणि नंतर सांत्वन मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही. मुस्लिम बांधवांनो, जागे व्हा. आपले मित्र आणि आपले शत्रू यातील फरक समजून घ्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. अलीकडेच वक्फ दुरुस्ती विधेयकाद्वारे मुस्लिमांच्या जमिनींना लक्ष्य केले जात आहे. देशभरात बुलडोझर चालवला जात आहे. सर्व परिस्थिती असूनही, मुस्लिम कोणत्या तोंडाने मोदींची भेट स्वीकारण्यास तयार होत आहेत? येथे हा प्रश्न नंतर सामान्य मुस्लिमांना विचारला जाईल. परंतु, प्रथम प्रश्न त्या मौलवींना आहे, जे या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. मौलवी जे निवडणुकीत तज्ज्ञ बनतात आणि कोणाला मतदान करायचे आणि कोणाला करू नये हे सांगतात, असे प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली

"सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली", या म्हणीला साजेशीच ही बाब आहे. या रमजानवेळी मोदींनी ३२ लाख मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या. गुजरात हिंसाचारात अनेक मुस्लिम बांधवांचा मृत्यू झाला होता. आता काही गोष्टींचे वाटप करून गोंजारण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच त्यांनी आठवण करून दिली की, तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, पेहलू खान, जुनेद खान, रकबर खान यांसारखे अनेक मुस्लिम मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत.

दरम्यान, इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टॅंड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केले जाते आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचे हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. मात्र, सौगात-ए-मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. अशात हे राजकीयदृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे. देशातून २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन चाललेले आहे. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला.

Web Title: vba leader prakash ambedkar criticized bjp and rss over saugat e modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.